शिवशाही बसच्या धडकेत जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील दुचाकीस्वार जागीच ठार

जामखेड/कडा (प्रतिनिधी) नगर- बीड महामार्गावरील धानो-याजवळ समोरून येणाऱ्या शिवशाही बस व मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

रामदास मिसाळ रा. आनंदवाडी ता. जामखेड आसे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रामदास मिसाळ नावाचे इसम जामखेडवरून नगरकडे दुचाकीवरून (क्र. एम. एच १६, ए.के.२४३१) जात होते. दरम्यान नगर-बीड महामार्गावरील धानोरा गावाजवळ दुचाकीवरील मिसाळ समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असतानाच, पुण्यावरून नांदेडला जात असलेली शिवशाही बस (क्र. एम. एच. ०९, ए.एफ.९७४९) समोरून आली होती. बीड-नगर महामार्गावर धानोऱ्याजवळ दुचाकीवरील मिसाळ समोरील गाडीला ओव्हरटेक असताना, याच दरम्यान, पुण्याकडून नांदेडकडे जात असलेली शिवशाही बस व दुचाकीच समोरासमोर धडक झाली.या अपघातात दुचाकीस्वार रामदास मिसाळ नावाच्या इसमाचा मृत्यू झाला.

सदर अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक सपोनि रोहित बेंबरे, अंमलदार शिवदास केदार, बाबुराव तांदळे, भरत माने, राजु कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक आरोग्य केंद्र कडा येथे मयताचे शवविच्छेदन करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here