

विकास कामांना खोडा आणि अधिकार्यांचे निलंबन करण्यात आ. राम शिंदे पटाईत – महाविकास आघाडीने केला हल्लाबोल..
अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीच्या वतीने जामखेड येथे काढला निषेध मोर्चा
जामखेड प्रतिनिधी
स्पर्धा ही विकासाची लावली पाहिजे मात्र चांगल्या अधिकाऱ्यांना सुडापोटी घरी लावण्याचे पाप आ. राम शिंदे हे करत आहेत. विकास कामांना विरोध आणि अधिकार्यांचे निलंबन करण्यात शिंदे पटाईत आहेत. मात्र येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जनताच आ. राम शिंदे यांना निलंबित केल्या शिवाय रहाणार नाही असा खोचक टोला महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी निषेध मोर्चा दरम्यान लावला.

राजकीय द्वेशातून निलंबित केलेल्या कर्जत जामखेड तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकार्यांच्या समर्थनार्थ आज गुरुवार दि २९ रोजी सकाळी जामखेड शहरातुन रॉली काढुन निषेध करण्यात आला. यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत- जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात सुर्यकांत (नाना) मोरे, राजेंद्र कोठारी, उमर कुरेशी, अमोल गिरमे, माजी सरपंच समीरभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, वसीम सय्यद, प्रशांत राळेभात, मोहन पवार, निखिल घायतडक, बजरंग डुचे, महेश राळेभात, पवण राळेभात, प्रकाश सदाफुले, प्रकाश काळे, अमर चाऊस, अमित जाधव, सुंदरदास बिरंगळ, राहुल आहेर सर, जुबेर शेख, राजु पवार, श्रीकांत लोखंडे, प्राचार्य विकी घायतडक, नरेंद्र जाधव,सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या वेळी महाविकास आघाडी मधिल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की गेल्या आडीच वर्षात जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. आ. रोहित पवार यांनी सुरु केलेली विकास कामे अधिकार्यांना सोबत राहुन मार्गी लावण्याचे काम सुरू आहेत.

ही कामे करत असताना आ. राम शिंदे हे विकास कामांना खोडा घालत आहेत. खांडवी येथील २५ कोटी रुपयांच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शिंदे यांनी आडकाठी आणली आहे. आ. राम शिंदे यांनी कोणते कर्जत जामखेड च्या विकासाचे प्रश्न विधान परिषदेत मांडले का? असा सवाल उपस्थित करून कर्जत जामखेड ला चांगले अधिकारी मिळाले त्यांनी सुट्टीच्या दिवशी देखील कामे केली आहेत. वैयक्तिक लाभाच्या कामे देखील मोठ्या प्रमाणात केली आहेत. शेतकर्यांची पोरं एम पी एस सी व यु पी एस सी परीक्षा देऊन मेहनत करुन पास होतात, नोकरी मिळवतात आशा कर्जत च्या प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यावर सुडबुद्धीने निलंबन करण्याचे पाप आ. शिंदे यांनी केले आहे.

खर्डा येथिल सिताराम बाबा व संत गीते बाबा देवस्थानांचा नीधी देखील आ. राम शिंदे यांनी रोखुन धरला त्यांना जनता माफ करणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यानंतर निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे यासाठी जामखेड तहसील यांना निवेदन देण्यात आले.






