जामखेड तालुका कासार समाजाच्या अध्यक्ष पदी सदाशिव तंटक तर उपाध्यक्ष पदी वसंत कोळपकर यांची निवड

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुका कासार समाजाच्या अध्यक्ष पदी सदाशिव तंटक तर उपाध्यक्षपदी वसंत कोळपकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जामखेड शहरात नुकतीच कासार समाजाची बैठक संपन्न झाली यावेळी या निवडी घोषित करण्यात आल्या. तसेच पुढील तीन वर्षांसाठी पदाधिकारी व कार्यकारिणी तयार करण्याचे सर्व अधिकार नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांना बहाल करण्यात आले.

जामखेड शहरातील व तालुक्यातील कासार समाज बांधवांच्या उपस्थितीत पूर्वनियोजित बैठक नुकतीच कालिका मंदिर येथे अतिशय खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात बैठक संपन्न झाली.या वेळी कासार समाजाचे मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर अच्चुतराव अंदुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले की माझा अध्यक्ष पदाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे नवीन निवड करण्यास माझी हरकत नाही. त्याच अनुषंगाने त्यांच्या परवानगीने, संमतीनेच पुढील तीन वर्षासाठी बहुमताने कासार समाज्याच्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी सदाशिव किसनराव तंटक व उपाध्यक्ष म्हणून वसंत माणिकराव कोळपकर यांची एकमताने निवड करण्यात आली. व पुढील तीन वर्षांसाठी पदाधिकारी व कार्यकारिणी तयार करण्याचे सर्व अधिकार त्यांना बहाल करण्यात आले.

नवनिर्वाचित अध्यक्ष मा सदाशिव तंटक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सर्व कासार समाज बांधवांनी, महिलांनी मंदिरात आलं पाहिजे. मिटिंग च्या दिवशी एकत्र येऊन कासार समाज संघटन वाढवले पाहिजे. व समाजाच्या काही अडचणी असतील तर त्या एकत्र मिळून सोडवल्या पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.

नवनिर्वाचित उपाध्यक्ष वसंत कोळपकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, कासार समाज हा अल्पसंख्याक आहे. आपल्या समाजाची पुढील ध्येय, धोरणे व दिशा ठरवण्यासाठी आणि विविध समाजोपयोगी सामाजिक उपक्रम घेण्यासाठी तरुणांनी पुढं येऊन कार्याची धुरा हाती घेतले पाहिजे. तरुणच समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो.

उपस्थित असलेल्या सर्वांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अनिल आष्टेकर सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here