
गणेगाव येथिल ओम साई शाम सेवक पालखी पदयात्रा दिंडीचे शिर्डी कडे प्रस्थान
जामखेड (प्रतिनिधी)
गणेगाव ते शिर्डी ओम साई शाम सेवक पालखी पदयात्रा दिंडीचे शिर्डी गणेगाव या ठीकाणाहुन शिर्डी कडे प्रस्थान झाले. या दिंडीचे या वर्षीचे तीसरे वर्षं आसुन २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर असा या दींडीचा प्रवास असणार आसल्याची माहिती पालखी प्रमुख अमोल मोरे यांनी दिली आहे.

सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात गणेगाव ते शिर्डी या पदयात्रा पायी दिंडीचे प्रस्थान गणेगाव येथुन झाले होते पहील्या दिवशी ही दिंडी जामखेड येथे दुपारी आल्यानंतर सदाशिव बोधले यांच्या निवासस्थानी दींडीतील भाविकांसाठी अन्नदान करण्यात आले. सदरची दिंडी पुढे आष्टी कडा चिचोंडी पाटील नगर राहुरी रहाता मार्गे शिर्डी या ठीकाणी शेवटच्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबर रोजी दाखल होणार आहे. या वर्षीचे या दींडीचे तिसरे वर्ष आहे.

सदर दींडी मध्ये संदीप पाटोळे, अमोल मोरे, विजु राऊत, कैलास इंगोले, अनिल पाटोळे, गोकुळ पवार, गोकुळ पैलवान, बंडु लोहकरे, संजय पवार व महीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. दोन जानेवारी रोजी सायंकाळी ही दिंडी गणेगाव या ठीकाणी आल्यावर साई भंडारा प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.





