

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाचा मोठा दिलासा, सीबीआयची याचिका कोर्टाने फेटाळली, जामिन झाला मंजुर..
माजी गृहमंत्री अनिल देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार आहेत.
मंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

देशमुख यांच्या जामीनाला स्थिगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे.

काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 2021 मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौखसी केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद केला होता.

देशमुख कुटुंब आनंदात
अनिल देशमुख बाहेर येणार त्यामुळे राऊत कुटुंबियांमध्येसुद्धा आनंदाचं वातावरण आहे. राष्ट्रवादीचे नेतेही खुश आहेत. आम्ही त्यांना महाविकास आघाडीचे नेते म्हणून भेटायला जाणार आहोत. त्यांच्या कुटुंबानी खूप त्रास सहन केला असेल. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना ईडी, सीबीआय, इनकम टँक्स लावली जाते. पण संजय राऊत बाहेर आले आता अनिल देशमुखही येतील, अशा भावना देशमुखांचे वकील अनिकेत देशमुख यांनी व्यक्त केल्या.






