हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जत येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार निलंबित

कर्जत (प्रतिनिधी) कर्जत येथील प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना गौण खनिज संदर्भात कारवाई करताना कुचराई केली म्हणून निलंबित करण्यात आले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे यामुळे कर्जत व जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत अनधिकृत खाण आणि स्टोनक्रेशर प्रकरणी कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले व कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे आदेश देण्यात आले आहेत.
या बाबत आ. प्रा. राम शिंदे यांनी याबाबत विधानपरिषदेत प्रश्न मांडला होता.

त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून कर्जत तालुक्यातील माळढोक अभय अरण्यासह कर्जत जामखेड तालुक्यातील पर्यावरणाची हानी होत असल्याने महसुल प्रशासनाने दोन्ही तालुक्यांतील खडीक्रेशर बंद ठेवण्यात आले होते. परंतु काही दिवसांपूर्वी प्रांत अधिकाऱ्यांनी सदर खडीक्रेशरवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई केल्याने खडी क्रेशर सुरू असल्याचे समोर आले. याच अनुषंगाने हे बेकायदेशीर असल्याचे सांगत यातील दोषी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आ. प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषद सभागृहात केली होती.

या निलंबनामुळे कर्जत व जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यात अनेक बेकायदेशीर खडी क्रेशर आहेत. याबाबत तक्रारी करुनही त्याची दखल घेण्यात आली नव्हती. चौकशीत प्रांताधिकारी व तहसीलदार दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here