

बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड लिखित धम्मपदा बोलतीदोहे आणि गाथा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न.
जामखेड (प्रतिनिधी) दि २६ डिसेंबर देहूरोड पुणे येथील बुध्द मूर्ती स्थापना दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनी 25 डिसेंबर 2022 रोजी धम्मभूमी या ठीकाणी जामखेड जि अहमदनगर चे बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड लिखित धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.डाॅ.भीमराव यशवंत आंबेडकर यांचे हस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाला.

आदरनीय डाॅ भीमराव यशवंत आंबेडकर यांनी लेखक गोकुळ गायकवाड यांच्या या प्रथम ग्रंथ लेखना बद्दल अभिनंदन केले व अशेच संशोधन पर लेखन करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. बुध्दाचे धम्मपद आणि कबीराचे दोहे व बुद्धाचे धम्मपद आणि संत तुकाराम महाराज यांच्या गाथेमधील ओव्या यांच्या तंतोतंत जुळणा-या, समानार्थी जोड्या शोधून नाविन्यपूर्ण असा लहानसाच पण उत्कृष्ट असा ग्रंथ लिहिला आहे.

हा लहानसा ग्रंथ विद्यार्थी ,शिक्षक, बौद्ध उपासक, उपासिका, प्राध्यापक, कीर्तनकार, प्रवचनकार, बौद्धाचार्य, केंद्रीयशिक्षक, यांना अत्यंत उपयुक्त असा आहे. हा ग्रंथ, 100 धम्म प्रचारक पूज्यभन्ते यांना धम्मदान करण्यात येणारअसल्याचे लेखक गोकुळ गायकवाड यांनी सांगितले आज धम्म भूमीतील 25 च्या वर ग्रंथ भिख्खू संघास दान केले
या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी ,मा सुशिलजी वाघमारे महासचिव महाराष्ट्र राज्य, यु जी बोराडे संस्कार उपाध्यक्ष, ज्ञानोबा कांबळे राष्ट्रीय मा.सचिव, अण्णासाहेब वाघमारे विभागीय सचिव, दिलीप सरोदे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, प्रकाशजी ओहळ पुणे प.जिल्हा अध्यक्ष, ऑड. अतुल सरोदे, संदेश घायतडक, चंदनशिवे, अक्षयकुमार गायकवाड, मनिषा साळवे, बौद्धाचार्य दत्ता गायकवाड, बौद्धाचार्य, उत्तम जोगदंड, अशोक शिंदे सह हजारो उपासक, उपासिकांचा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे उपस्थित होता.







