कर्जत जामखेड मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीमुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होणार – वाहेद पठाण

जामखेड (प्रतिनिधी) कर्जत जामखेड सारख्या दुष्काळी भागाचा कायापालट आ.रोहित (दादा) पवार हे करत आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघात औद्योगिक वसाहत (MIDC ) देखील आ.रोहित (दादा) पवार यांनी मंजुर करुन आणली त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून नवीन उद्योग या ठिकाणी सुरू होणार आहेत. नव्याने होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे मतदारसंघातील विकासाला चालना मिळणार आहे आसे मत पाटोदा गरडाचे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसरपंच वाहेद पठाण यांनी व्यक्त केले .


पुढे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटोदा गरडाचे येथील उपसरपंच वाहेद पठाण म्हणाले की
कर्जत आणि जामखेड तालुक्यातील गावांमध्ये विविध प्रकारचे शिक्षण घेतलेले बेरोजगार तरुण आहेत. त्यांना नोकर्‍या मिळणे देखील कठीण होऊन बसले आहे .मात्र कर्जत जामखेड चे आ.रोहित (दादा) पवार यांनी या बाबत गांभीर्याने विचार करत आखेर कर्जत जामखेड मतदारसंघात औद्योगिक वसाहत (MIDC )मंजुर करून आणली त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कैतुक होत आहे. या औद्योगिक वसाहतीमुळे आनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच कीतीतरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे उद्योजक आधार होणार आहेत .विषेश म्हणजे दोन्ही तालुक्याच्या दुष्टीने जवळ असणाऱ्या पाटेगाव खंडाळा भागात ही औद्योगिक वसाहत होणार आहे.

या ठिकाणी होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे कर्जत जामखेड च्या विकासात भर पडणार आहे .या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्याने नवतरुणांना पोटापाण्यासाठी स्थलांतर होण्याची गरज भासणार नाही. विषेश म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून आ.रोहित (दादा) पवार हे औद्योगिक वसाहत आणण्यासाठी प्रयत्न करत होते आखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील पाटोदा गरडाचे येथिल राष्ट्रवादी काँग्रेस चे उपसरपंच व नागरिकांनी आ. रोहित (दादा) पवार यांचे आभार मानले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here