एमआयडीसी मुळे कर्जत जामखेड च्या विकासात भर पडणार – उद्योजक आकाश बाफना
कर्जत जामखेड मतदारसंघात औद्योगिक वसाहत (MIDC) मंजुर झाल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न व कर्जत जामखेड तालुक्यातील उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच उद्योगधंदे वाढुन व कर्जत जामखेड च्या विकासात भर पडणार आसल्याने जामखेड येथिल बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना यांनी व कर्जत जामखेड वासियांकडून आ. रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित जामखेड-कर्जत तालुक्यासाठी औद्योगिक वसाहत क्षेत्र अखेर मंजूर झाले. यामुळे जामखेड- कर्जतच्या विकासात खूप मोठी भर पडणार आहे. नवयुवक, शिक्षित, उच्चशिक्षित तरुणांना भविष्यात पुणे, मुंबई व इत्यादी शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. औद्योगिक वसाहतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल व जामखेड- कर्जतचे राहणीमान उंचावेल व विशेष महत्त्व प्राप्त होईल सदरील वसाहतीसाठी आमदार रोहित दादा पवार यांनी सतत पाठपुरावा करून यश संपादन केले यामुळे बाफना उद्योग समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर आकाश बाफना व कर्जत जामखेड वासियांकडून आ. रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.





