जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची आखेर बदली

जामखेड शहर भाजप कडुन करण्यात आली होती बदलीची मागणी 

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांच्या बदलीचे आदेश नगर विकास विभागाकडून नुकतेच प्राप्त झाले आसल्याने त्यांची जामखेड नगरपरिषद मधुन बदली झाली आसुन या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्य़ातील आहेरी नगरपंचायत येथुन बदली झालेले मुख्याधिकारी अजय साळवे हे जामखेड नगरपरिषदे मध्ये मुख्याधिकारी म्हणून आले आहेत. त्यांची बदली करावी या मागणीसाठी देखील भाजपकडुन मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती.

मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. त्यांच्या काळात काही घरकुल, दिव्यांग घटकांसाठी योजना आशा विषयांवर जरी चांगले काम झाले असले तरी आरोग्य, रस्ते, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, जनतेशी, नगरसेवकांशी, काही ठराविक कार्यकर्त्यांशी त्यांची वागणूक नेहमीच दुजाभावची राहिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या फलकावरून झालेल्या वादामुळे तर त्यांनी नको तो प्रसंग ओढावून घेतला होता. तसेच बर्‍याच वेळा विविध विषयांवर अंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी अनेक वेळा त्यांनी हुज्जत घातलेली आहे. या सह अनेक विषयांबाबत ते वादग्रस्त ठरले होते.
दंडवते यांच्याकडून जनतेला होत असलेल्या त्रासातून सुटका व्हावी यासाठी नगरसेवक आमित चिंतामणी व बिभीषण धनवडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रा राम शिंदे साहेबांकडे दंडवते यांच्या कारभाराची तक्रार केली होती.


तसेच जामखेड शहर देखील भाजपाच्या वतीने देखील मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली व्हावी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे जाऊन बदलीसाठी मागणी केली होती. त्या मागणीला आज यश आले आहे. मुख्याधिकारी यांच्या बदलीमुळे अनेक जामखेडकरांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल.

मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या जागी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय साळवे यांची बदली झाली आहे. ते 26 डिसेंबर 2022 रोजी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील असे आदेशात म्हटले आहे.

भाजप कडुन फटाके फोडून आनंदोत्सव साजरा…

गेल्या आनेक दिवसांपासून जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली व्हावी यासाठी जामखेड शहर भाजपकडुन प्रयत्न सुरू होते. याच अनुशंगाने काल दि २४ रोजी सायंकाळी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली झाल्याची माहिती भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या कानावर पडताच त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here