सिक्कीममध्ये लष्कराच्या गाडीला मोठा अपघात; 16 जवान शहीद

सिक्कीम: सिक्कीममध्ये एक मोठा रस्ता अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लष्कराच्या गाडीला अपघात होऊन १६ जवान शहीद झाले आहेत. घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे वळणावर मोठा उतारा होता. तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जवानांची बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत १६ जवानांचा मृत्यू झाला आहे.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीममधील गेमा येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन सकाळी चतनहून थांगूच्या दिशेने निघाला होते. जेमाकडे जाताना एका तीव्र वळणावर लष्कराच्या तीन वाहनांपैकी एक ट्रक तीव्र उतारावरून घसराला. यात गाडीतील १६ जवान शहीद झाले असून, चार जवान जखमी झाले आहेत.

अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून, अपघातातील चार जखमी जवानांना उपचारांसाठी विमानाने हलवण्यात आले. या रस्ते अपघातात तीन कनिष्ठ आयोग अधिकारी आणि 13 सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राष्ट्रपतींनी व्यक्त केलं दुःख

सिक्कीममध्ये लष्कराच्या गाडीला झालेल्या अपघात शहीद झालेल्या जवानांबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केले. घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त करत जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here