

कोविड येणार म्हणून दलाल लुटायला तयार; चीनमध्ये बंद नाहीच, चक्क बातम्या चुकीच्या- डॉ. अचल श्रीखंडे
मंबई दि. २३ (प्रतिनिधी) ना सरकारी कार्यालय ना बाजार बंद, सर्व काही ठीक आहे. चीनमधील कोरोना संदर्भात येत असलेल्या बातम्या खोट्या आणि अतिरंजीत असल्याचे चीनमध्ये रहात असलेले भारतीय डॉ. अचल श्रीखंडे यांनी सांगितले आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याबद्दल संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात तर चीनमधील दवाखान्याचे फोटो दाखवून लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. कोरोना येणार म्हणून काही ठराविक दलाल लुटण्यासाठी तयार झाले आहेत. कोरोनाच्या काळात काही वैद्यकीय व्यवसायीक आणि डॉक्टर्स यांनी मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेची लूट केली.

चीनच्या संदर्भात येत असलेल्या बातम्यांमुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा आपण दोन वर्षापुर्वीच्या स्थितीकडे जातो की काय? अशी चर्चा होत आहे. पण चीनमधील जे चित्र उभे केले जात आहे ते वास्तवीक नाही. चीनमध्ये काहीच काळजीची परिस्थिती नाही असं डॉक्टर अचल श्रीखंडे यांनी ए बी पी माझा वृत्त वाहिनीला मुलाखत देतांना सांगितले. डॉ. श्रीखंडे हे चीनमधील शांघाय येथे आहेत ते म्हणतात कोविड हा आपल्या सोबत राहणार आहे तो संपूर्ण नष्ट होणार
नाही. कोविड आता संसर्गजन्य रोग बनला असून तो सगळ्यांना होईल.

सध्या चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे पण त्यासाठी काळजीचे कारण नाही. ते म्हणाले की, चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे खरं आहे परंतु त्यामुळे चिंताजनक स्थिती कोठेही नाही. आम्ही डॉक्टर खुश आहोत, आम्हाला किमान कोरोनाचे रुग्ण तपासता येत आहेत. लोक खुश आहेत, त्यांना सततची सक्ती होत होती ती दूर झाली आहे. जगभरात दाखविण्यात येते तशी परिस्थिती चीनमध्ये नाही चीन मध्ये पसरणारा व्हेरीएंट हा ॲमीक्रॉन आहे तो वेगाने पसरतो परंतु अतिशय माईल्ड आहे. तीन दिवसांच्या उपचारा नंतर सर्व वयोगटातील लोक बरे होत आहेत. केवळ दोन गोळ्या आम्ही देत आहोत.

ना सरकारी कार्यालय ना बाजार बंद
आम्ही सगळे डॉक्टर्स यासाठी तयार होतो, रुग्णालय तयार होतील हा नॉर्मल क्यू आहे. रुग्णाला व्हेंटीलेटर्सची गरज पडत नाही त्यामुळे आम्ही याला अतिशय नॉर्मली ट्रीट करत आहोत. एक-दोन दिवसात रुग्ण घरी परत जातो आहे. बहुसंख्य रुग्ण तर रुग्णालयात येतच नाहीत. त्यांना कम्पल्सरी दिवस घरी थांबायचे आहे, कुठेही काहीही बंद करण्यात आलेले नाही.ना शाळा बंद आहेत, ना सरकारी कार्यालय ना बाजार, सर्वकाही चालू आहे असे डॉ. श्रीखंडे म्हणाले.

चीनमध्ये लोक रस्त्यावर मोकळे फिरताहेत, आनंद घेताहेत
जगभरात दाखविलं जातं तशी परिस्थिती चीनमध्ये अजिबात नाही. चीनमधील क्वारंटाईन सेंटर बंद करण्यात आलेली आहेत. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांना ७ दिवसासाठी घरातच रहावं लागतं. झीरो कोविड पॉलिसी मागे घेतल्याने लोक रस्त्यावर मोकळे फिरत आहेत. मॉल्समध्ये जात आहेत, आनंद घेत आहेत. कशाही प्रकारची चिंता नाही.

चीनमध्ये ऑक्सिजनची कमतरता नाही, हॉस्पिटलही भरलेली नाहीत
डॉ. श्रीखंडे म्हणाले की, बहुतांश रुग्ण असिमटमॅटीक आहेत. मी ज्या रुग्णालयात काम करतो तिथे अशी स्थिती नाही. रुग्णालय रुग्णांनी भरलेली नाहीत. ऑक्सिजनची कमतरता नाही, लोकांना व्हेंटीलेटरवर ठेवण्याची गरज नाही. मृत्युदर अत्यल्प असून तो केवळ वयाच्या ६० नंतरच्या काही रुग्णांमध्ये आढळतो.
भारतीयांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही
डॉ. अचल श्रीखंडे म्हणाले चीनमधला व्हेरीएंट ॲमीक्रॉन आहे, त्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असलेल्या डेल्टा व्हेरीएंटमधून भारतीय नागरीक गेले आहेत, त्यामुळे कोरोनाबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. कोविडमुळे मृत्युचे थैमान सुरु आहे अशा बातम्या चुकीच्या आहेत. भारतीयांना काळजी करण्याचे कारण नाही.





