संघटनेचे सभासद होऊन संघटनेची ताकद वाढवा -जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ गाडळकर

जामखेड : (प्रतिनिधी) संघटना ही केमिस्ट सभासदांच्या आडचणी सोडवण्यासाठी आहे. आपली मायमाऊली म्हणजेच आपली संघटना आहे .त्यामुळे संघटनेचे सभासद होऊन संघटनेची ताकद वाढवण्याची गरज आहे आसे मत अहमदनगर जिल्हा केमिस्ट असोशिएशन चे अध्यक्ष दत्ताभाऊ गाडळकर यांनी व्यक्त केले आहे.

जामखेड तालुका केमिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष तात्याराम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली व जामखेड तालुका केमिस्ट असोशिएशनच्या वतीने नवनिर्वाचित अहमदनगर जिल्हा केमिस्ट असोशिएशन चे अध्यक्ष दत्ताभाऊ गाडळकर व शेवगाव चे नामांकित केमिस्ट व्यक्तीमत्व सचिन पारख यांचे औषध व्यावसाय संबंधित मार्गदर्शन कार्यक्रम २१ डिसेंबर रोजी दुपारी जामखेड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी यावेळी जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ गाडळकर यांची शहरातुन भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती .

यावेळी केमिस्ट असोशिएशन चे जिल्हासचिव आबासाहेब बेद्रे ,खजिनदार प्रशांत उबाळे ,पारनेर चे तालुका अध्यक्ष शैलेंद्र औटी, शेवगाव चे तालुका अध्यक्ष सुरज लांडे ,कमलेश गुंदेचा, सचिन ढगे, विनोद टाकसळ ,भरत सुपेकर,सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शेवगाव येथील नामांकित केमिस्ट व्यक्तीमत्व सचिन पारख यांनी औषध व्यावसाय संबंधित जामखेड येथील केमिस्ट बांधवांना मार्गदर्शन केले.

जामखेड तालुका केमिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष तात्याराम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष अनिल बोथरा, सचिव कीरण वाघमारे, खजिनदार महेश नारके, फैसल खान, विकास आजबे, शुभम खेत्रे ,आरबाज सय्यद ,अंगद मुळीक, सागर बाबार, प्रविण कात्रजकर ,नारायण राळेभात ,अक्षय कासव, यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here