लक्ष्मीपुत्र फाउंडेशन तर्फे नान्नज येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस आर्थिक मदत

नान्नज येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस पाच वर्गखोल्यांची गरज आहे ही आडचण लक्षात घेत लक्ष्मीपुत्र फौंडेशन च्या संचालीका व भाजपा महीला उपाध्यक्षा मंजुश्रीताई जोकारे यांनी शाळेस आर्थिक मदत केली आहे.

यावेळी भाजपा महिला उपाध्यक्षा मंजुश्रीताई जोकारे यांनी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, तसेच सर्वाना देणगी देण्याचे आव्हान केले, यावेळी किशोर जोकारे, मंजूश्रीताई जोकारे, मनीषाताई मोहोळकर, सरपंच संतोष पवार, अनिल हजारे, अजित पंडित, केशवराव कोल्हे, आसिफ पठाण, वैभव साबळे, रावसाहेब मोहोळकर, मजहर पठाण, धनंजय मोहोळकर, नान्नज शाळेचे मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक मनोज कुमार कांबळे आदी शिक्षक तसेच ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती मधील सदस्य उपस्थित होते.

वेळी बोलताना मंजूश्रीताई जोकारे यांनि बोलताना सांगितले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नज येथे लहान मुलांना शाळेच्या वर्गात बसण्यासाठी वर्ग कमी पडत आहेत. त्यामुळे येथील पाच खोल्या बांधावयाची गरज आहे. त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. याच अनुशंगाने याचा मान ठेवून आम्ही आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील सर्व माजी विद्यार्थ्यांनाही जास्तीत जास्त वर्गणी देण्याचे आवाहन केले. स्वतः सौ मंजूश्रीताई जोकारे यांनी मदत देण्यास सुरुवात करून जास्तीत जास्त वर्गणी कशी करता येईल यासाठी प्रयत्न करून एक समाज्या समोर आदर्श घालून दिला आहे.

शाळेस मदत केल्याबद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे व सौ.मंजूश्रीताई किशोर जोकारे संस्थापक अध्यक्षा लक्ष्मीपुत्र फौंडेशन यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here