

वय उलटून गेले तरी कुणी मुली देईना, लग्न होईना’, घोड्यावर बसून तरुणांनी काढला ‘नवरदेव मोर्चा’, सोलापूरकर पडले बुचकळ्यात
सोलापूर, (प्रतिनिधी) या मोर्चामध्ये चक्क नवरदेवाच्या वेशावत घोड्यावर बसून तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले होते. या मोर्चामध्ये चक्क नवरदेवाच्या वेशावत घोड्यावर बसून तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले होते.

विविध मागण्या आणि एखाद्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा आणि आंदोलन केली जात असतात. पण, आज सोलापूरमध्ये एक वेगळाच मोर्चा पाहण्यास मिळाला. लग्न होत नाही, मुली कुणी देत नाही म्हणून अविवाहित तरुणांनी चक्क जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या संघटना आपल्या मागण्यासाठी मोर्च काढत आहे. पण, सोलापूरमध्ये अविवाहित तरुणांनी वेगळ्याच मागणीसाठी मोर्चा काढला.

या मोर्चामध्ये चक्क नवरदेवाच्या वेशावत घोड्यावर बसून तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. बँड बाजा लावून या तरुणाचा मोर्चा निघाला होता. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं नवरदेव कुठे चालले यामुळे लोकही बुचकळ्यात पडले होते. अखेर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.

मोर्चातील तरूणाची एकच मागीणी आहे ‘आम्हाला मुलगी द्या.’ हा मोर्चा ज्योतिक्रांती च्या वतीने काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे, तसेच हा मोर्चा काढण्याचा उद्देश देखील सांगण्यात आला तो की साध्या मुलींचा तुटवडा जानवत असल्याने, तसेच मुलांच्या तुलनेत मुलींच प्रामाण हे कमी असे दिसून येत आहे, गरीबा मुलांना मुली मिळत नाही. सरकारी नोकरी, व्यवसाय इत्यादी तरूणाला मुली मिळता मात्र गरीब मुलांना मुली मिळत नाही असे विविध प्रश्न घेऊन हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

वय उलटून गेले तरी केवळ मुली मिळत नसल्याचं म्हणणं या तरुणांनी मांडलं. राज्य सरकारने गर्भलिंग निदान चाचणी बंद केली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, आज 100 मागे 10 ते 12 मुलं लग्नाची राहिलेली आहेत. 5 वर्षानं वाढेल 15 ते 20 होतील. ही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे राज्य सरकारने याचा विचार करावा, अशी मागणी या तरुणांनी केली आहे.






