चर्चा तर होणारच!, सरपंचपदाच्या महिला उमेदवाराचा जाहीरनामा चक्क नोटरीसह स्टॅम्प पेपरवर…

भंडारा : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदार वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. भंडारा जिल्ह्यात अशाच एका निवडणूक जाहीरनाम्याची चर्चा सुरु आहे. यामुळं गावागावतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

भंडारा जिल्ह्यातही 305 ग्रामपंचायतीच्या निवडणूक लागली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सोमनाळा येथील सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या छबू दिगंबर वंजारी यांनी चक्क 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावागावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवार प्रचारासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार भंडारा जिल्ह्यातील सोमनाळा येथील सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या छबू दिगंबर वंजारी यांनी चक्क 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कायद्याच्या चाकोरीत बसणारा या जाहिरनामा भंडारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

गावात स्थानिक पातळीवरील दिग्गज स्थानिक नेते असताना आपण निवडणुकीत उभे असल्याने १२०० लोकसंख्या असलेल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी चक्क आपला जाहीरनामा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आहे. दोन पानी लिहिलेला हा जाहीरनामा आपण निवडून आल्यास आपल्याला बंधनकारक राहील असे त्यांनी म्हटले आहे.

उमेदवार मतदारांच्या भरवशावर निवडणूक येतात व त्याच मतदारांच्या विकासकामांचा त्यांना विसर पडतो. म्हणून मतदार उमेदवारांकडून नाराज असल्याने मतदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण असे केल्याचे वंजारी सांगतात. त्यामुळे हा जाहीरनामा केवळ आपल्याला नाही तर आपल्या पूर्ण पॅनलसाठी बंधनकारक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here