शिऊर गावच्या केलेल्या विकास कामांच्या जोरावर विजय निश्चित – बापुसाहेब माने

जामखेड (प्रतिनिधी) गेल्या पाच वर्षांत आ. प्रा राम शिंदे त्यांच्या प्रयत्नातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या शिऊर गावच्या विविध विकास कामांच्या जोरावर श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनलची विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास शिऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उभे आसलेले व सर्वांच्या हाकेला धावणारे उमेदवार बापुसाहेब माने यांनी बोलताना व्यक्त केला.

शिऊर ग्रामपंचायत निवडणुक २०२२ यासाठी श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनल मधुन सरपंच पदासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम (आणा) उतेकर यांच्या पत्नी सौ गिरजा गैतम उतेकर या निवडणुकीसाठी उभ्या आहेत. तर वार्ड क्रमांक एक मधुन या पॅनल मध्ये अनु. जाती मधुन समुद्र आजिनाथ भिकु, सर्वसाधारण मधुन आजिनाथ बन्सी निकम, सर्वसाधारण स्त्री मधुन प्रियांका भाऊसाहेब तनपुरे या निवडणुकीत उभ्या राहिल्या आहेत. तर वार्ड क्रमांक दोन मध्ये ना. मा. प्र मधुन फाळके सेवक शहाजी हे उभे राहिले आहेत. तर या पुर्वीच या वार्ड मधिल सौ शितल अशोक इंगवले व सौ शोभा बापु पिंपरे हे बिनविरोध विजयी झाले आहेत. तसेच वार्ड क्रमांक तीन मधुन सर्व साधारण पुरुष मध्ये बापुसाहेब प्रल्हाद माने, सर्वसाधारण स्त्री मधुन उषा नारायण निकम व राजश्री दादा लटके हे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी उभे आहेत. या निवडणूकीसाठी यांनी श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनल उभा केला आहे. या बाबत संकटकाळी मदतीला धावणारे व आहोरात्र जनतेची सेवा करणारे शिऊर येथिल ग्रामपंचायत सदस्य व उमेदवार बापुसाहेब माने यांनी या निवडणुकीत आम्ही केलेल्या विकास कामांमुळे आमच्या पॅनेलचा विजय निश्चित आहे आसे सांगितले.

पुढे बोलताना शिऊर ग्रामपंचायतीचे उमेदवार बापुसाहेब माने यांनी सांगितले की मी शिऊर ग्रामपंचायत मध्ये गेल्या दहा वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पहात होतो. ग्रामपंचायत काळात शिऊर गावात रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून आ. प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नातून नविन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधले आहे. तसेच आ. प्रा राम शिंदे हे मंत्री असताना गावासाठी ४० लाख रुपयांचा नीधी सिमेंट बंधारे बांधण्यासाठी आणला होता. शिऊर गावच्या तीन्ही रस्ते डांबरीकरण च्या माध्यमातून जोडण्यात आले आहेत. १९७२ साली बांधण्यात आलेल्या वाघजाई तलावाचे खोलीकरण हे आ. प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून जलसंधारणाची व जैन फौंडेशन च्या माध्यमातून खोलीकरण व सांडवा दुरुस्ती ची कामे पूर्ण केली आहेत. तसेच त्या वेळी भाजपचे सरकार असताना राजुरी शिवापासुन ते घाटेवाडी तलावा पर्यंत साखळी बंधारे बांधण्यात आले आहेत.

सध्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भैरवनाथ मंदिरास नीधी व खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांच्या प्रयत्नातून या मंदिरास क वर्ग तिर्थक्षेत्र समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला होता. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिऊर गावातील दलितवस्ती कॉंक्रीटीकरण, जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना आणण्यासाठी देखील मी पाठपुरावा केला आहे.

शिऊर ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून जामखेड नगरपरिषदेचा शिऊर येथिल बेदरमळा येथे होणार कचरा डेपोला विरोध केला. यासाठी गावातील शिष्टमंडळ घेऊन तहसीलदार यांना निवेदन दिले होते त्यामुळे सदरचा कचरा डेपो इतरत्र हलवावा लागला. आशी आनेक विकास कामे आम्ही शिऊर गावात ग्रामपंचायत काळात केली आहेत. त्यामुळे श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनल चा विजय निश्चित आहे आसे मत बापुसाहेब माने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here