जामखेड शहरात भरदिवसा झाली ९० हजारांची चोरी

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड शहरातील शिक्षक कॉलनी या ठीकाणी अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात कोणी नसताना आतमध्ये शिरुन ९० हजारांची चोरी केली आहे. भरदिवसा झालेल्या चोरीने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की दि १२ डिसेंबर रोजी फीर्यादी बजरंग डोके हे सकाळी बाहेरगावी गेले होते. तर त्यांचा मुलगा शेतात काम करण्यासाठी गेला होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फीर्यादीच्या उघड्या आसलेल्या घरात कोणी नसताना प्रवेश करुन फिर्यादीचे बेडरुमधील लोंखडी कपाटात ठेवलेले ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागीने चोरुन नेले. भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी बजरंग तुळशीराम डोके (माजी सैनिक) रा-शिक्षक काँलनी, ता. जामखेड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. काँ. संजय लोंखडे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here