

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
मंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन ही धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन ही धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी ग्रामदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन देशी कट्ट्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. सिल्व्हर ओकवर तैनात असलेल्या पोलिसांच्या फोन ऑपरेटरने पोलिसांकडे यासंबंधित तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक चौकशी करत आहेत. सोमवारीच शरद पवार यांचा वाढदिवस साजरा झाला होता. त्यांनंतर आज त्यांना आलेल्या धमकीच्या फोनमुळं मोठी खळबळ उडाली आहे.






