पंचवीस वर्षे एकहाती सत्ता, गावाला नाही पाण्याचा पत्ता

पारदर्शक कामासाठी शहर विकास आघाडीला विजयी करा- मा. आ. धोंडे

कडा (वार्ताहर) पंचवीस वर्षे ग्रामपंचायतवर एकहाती सत्ता असूनही गावाला पिण्याच्या पाण्याचा नाही पत्ता, सत्ताधा-यांकडून अद्याप साधा पाणी प्रश्न मार्गी लागलेला नाही. धरणात पाणी अन् घशाला कोरड, अशी अवस्था कड्याची झाली आहे. त्यामुळे कडेकरांचा हा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागावा, म्हणून केंद्र शासनाने साडेतेरा कोटीच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. मात्र ही लोकहिताची योजना पारदर्शक कामातून राबवायची असेल तर कडा शहर विकास आघाडीच्या पॅनलला प्रथम पसंतीचे मत देऊन सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे. असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे.

आष्टी तालुक्यातील कडा येथील ग्रामदैवत मौलाली बाबा दर्गाह येथे फुलांची चादर व श्रीफळ अर्पण करुन शहर विकास आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी धोंडे बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप पांडुरंग कर्डीले महाराज हे होते.

पुढे बोलताना धोंडे म्हणाले की, आष्टी तालुक्यात सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून कड्याचा नावलौकिक आहे. शेजारच्या अनेक गावामधील शेतक-यांसह विद्यार्थी, नागरीकांचा दैनंदिन कामासाठी येथे संपर्क येत आहे. मात्र वर्षानुवर्षे कडा ग्रामपंचायत ताब्यात असूनही याठिकाणी नागरीक मुलभूत सोयी- सुविधांपासून कायम वंचित आहेत. पंचवीस वर्षापासून प्रस्थापितांकडे ग्रामपंचायतचा कारभार असून साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्याकडून सुटला नाही. आजही खाजगी टँकरच्या माध्यमातून मिळणा-या विकतच्या पाण्यावर कडेकरांची तहान अवलंबून आहे. केवळ ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून विकासाचा डांगोरा पिटला जात आहे. एवढ्या मोठ्या शहरातील समस्यांची मालिका अजूनही संपलेली नाही. पाणी, वीज, रस्ता, नाल्या यासारखे सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न देखील सुटले नाहीत. फक्त एखादी निवडणूक आली की विकासासाठी कोटीचे आकडे ऐकायला मिळतात. पण गावाचा विकास मात्र भिंगातून शोधावा लागत आहे. आम्ही गावाचा विकास केला म्हणून सत्ताधा-यांकडून सांगण्यात येते, परंतू विकास नेमका कुणाचा झाला, ठराविक व्यक्तींचा की गावाचा हे आता सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे. भविष्यात शहराच्या विकासासाठी मुलभूत समस्यांची जाण असणा-या व लोकसंपर्कात राहून पारदर्शक काम करु पाहणा-या शहर विकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवारांसह पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विचार करून ग्रामस्थांनी मतदान करण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत ग्रामपंचायत ताब्यात असताना फक्त अन् फक्त विकासाचा पांढरा हत्ती दाखवून जनतेची दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे आता तहानलेल्या कडेकरांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने साडेतेरा कोटीच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. मात्र भविष्यात लोकहिताची ही योजना पारदर्शक राबवायची असेल तर कडा शहर विकास पॅनलला प्रथम पसंतीचे मत देऊन सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे. असे आवाहन धोंडे यांनी केले. आपण आमदार असताना अनेक विकासाच्या योजना आणून राबवल्यात. पण त्याचे श्रेय दुसरेच घेत आहेत. कडा शहरात सुसज्य एसटी बसस्थानक व्हावे, यासाठी आम्ही सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करुन दोन कोटी मंजूर केले. परंतू विरोधकांनी अडथळा आणून राजकीय व्देषापोटी विरोधाला विरोध केल्यामुळे बसस्थानकाचे काम होऊ दिले नाही. त्यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आतातरी एकत्रित येऊन शहर विकास पॅनलच्या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना पारदर्शक काम करण्याची संधी द्यावी. असे आवाहन धोंडे यांनी केले. तर शंकर देशमुख म्हणाले की, कडा गावाचा सर्वांगीन विकास हेच आमचे ध्येय असून भीमराव धोंडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे नि:स्वार्थीपणे पारदर्शक काम करणार असल्याचे सांगीतले. याप्रसंगी राजाबापू नलावडे, सय्यद रज्जाकभाई, राजेंद्र धोंडे, प्रा. शाम सांगळे, सुनील मेहेत्रे, प्रा. मुस्ताक पानसरे, सचिन शिंदे, नाना देशमुख, नितीन गायकवाड, सुदाम जाधव, नितीन बाळशंकर, राजेंद्र तांगडे, सचिन शिंदे, गणेश घोलप, बाळू देशमुख, रविद्र कर्डीले, सागर परभणे, विकास धर्माधिकारी, बजरंग कर्डीले, सुनिल देशमुख यांच्यासह सरपंच पदाच्या उमेदवार सौ गिरीजा देशमुख, माधुरी देशमुख,अलकाबाई कर्डीले, शिल्पा जाधव, मिठू मेहेत्रे, शेख झाकीरउद्दीन, राजेश शिंदे, ज्योती गायकवाड, महेश पवळ, अशोक खंदारे, यमुनाबाई कदम, छगन कर्डीले, सुनिता तांगडे, निलाबाई बाळशंकर, सय्यद इब्राहिम, संगिता धनवटे, अंजली गायकवाड आदी उमेदवार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विनोद ढोबळे, सुत्रसंचालन प्रा शाम सांगळे यांनी केले तर आभार दीपक बोराडे यांनी मानले.
———%%——
चौकट- १

आपण आमदार असताना अनेक गावांसाठी विकासाच्या योजना आणून पारदर्शक काम केले. परंतू त्या कामाचे श्रेय विरोधक घेत आहेत. कड्यात सुसज्य एसटी बसस्थानक व्हावे. यासाठी आपण शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करुन दोन कोटी मंजूर करुन आणले. मात्र राजकीय व्देषापोटी विरोधकांनी या कामातही अडथळा आणल्यामुळे कडा गावात ही भव्य वास्तू होऊ शकलेली नाही.
-मा. आ.भीमराव धोंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here