

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केल्यास आंबेडकरी जनता सहन करणार नाही- सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले.
जामखेड प्रतिनधी-१० डिसेंबर
कुणीही उठतयं आणि महापुरुषांन बद्दल बेताल वक्तव्य करत आहे. पक्ष कोणताही असो व्यक्ती कीतीही मोठी आसो आम्हाला त्यांच्याशी देणेघेणे नाही मात्र देशासाठी योगदान आसलेल्या महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केल्यास आंबेडकरी जनता कदापिही सहन करणार नाही आसे मत जामखेड चे सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी निषेध करतावेळी व्यक्त केले.

जामखेड शहरातील खर्डा चौक येथे समस्त भिमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने चंद्रकांत पाटील (उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) भाजपा यांनी शिक्षणाचे जनक महात्मा जोतीराव फुले, शिक्षणमहर्षि कर्मवीर भाऊराव पाटील व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. त्या निषेधार्थ समस्त भिमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसेच घोषणा देत निषेध करण्यात आला यावेळी विकीभाऊ सदाफुले बोलत होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, बापूसाहेब गायकवाड ,जमीर सय्यद , राजन समिंदर, दिपक घायतडक, सचिन सदाफुले ,अतिश पारवे यांनी निषेध व्यक्त केले. या निषेधसाठी मुस्लिम समाज व माळी समाज यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मा.कन्हेरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मा. विकीभाऊ सदाफुले (सामाजीक कार्यकर्ते), मा.निखिल घायतडक (माजी नगराध्यक्ष), बापूसाहेब गायकवाड (भिमटोला ग्रुप), राजन समिंदर, राजेंद्रतात्या सदाफुले, रवि सोनवणे, सचिन (आण्णा) सदाफुले, संदेश घायतडक, विनोद सोनवणे, प्रमोद सदाफुले, दिपक घायतडक, सचिन (जाॅकी)सदाफुले, सुर्यकांत सदाफुले, यांच्या सह्या आहेत.

यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, आरपीआयचे बाबा सोनवणे, जमीर सय्यद, सोमनाथ राऊत, मुकुंद घायतडक, सुर्यकांत सदाफुले, विनोद घायतडक, दिपक सदाफुले, विकीभाई गायकवाड, मनीष घायतडक, प्रतिक निकाळजे, अमोल गव्हाळे, आदी सह शेकडो भिमसैनिक उपस्थित होते.






