माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन

अहमदनगर :माजी खासदार तुकाराम गडाख (वय ७२) यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. शुक्रवारी रात्री खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर पानसवाडीच्या (ता. नेवासा) अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तुकाराम गडाख यांना गुरुवारी मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचा धाडसी स्वभाव व कार्यकर्त्यांना संभाळण्याची मोठी ताकद त्यांच्यात असल्यामुळे जीवाभावाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे होते त्यामुळे राजकारणात तुकाराम गडाख यांचे नांव समोर आले की भल्या–भल्यांची बोलतीच बंद होत होती त्यांना भाऊ या आदरतिथ्य नावाने ओळखले जात होते.

यांच्या निधनाचे वृत्त आज पहाटे समाजमाध्यमात फिरत होते माञ अखेर राजकारणातील तुफाणी व्यक्तीमत्व असलेले माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांच्या निधनाने कार्यकर्त्यांना जीव लावणारा लढवय्या नेता हरपल्याची जनभावना निर्माण झालेली आहे. गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here