काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा अडीच लाखांचा तांदुळ जामखेड मध्ये पकडला

जामखेड (प्रतिनिधी) काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा सुमारे अडीच लाख रुपये कीमतीचा १५ हजार कीलो तांदुळ ट्रकसह जामखेड पोलीसांनी पकडला. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील ईट येथुन हा तांदुळ नगरकडे चालला होता .या प्रकरणी दोन जणांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


जामखेड पोलीस स्टेशनचे फीर्यादी पोलीस काॅन्स्टेबल अरुण तुकाराम पवार, (वय-३२) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० वाजताचे सुमारास मी व पोलीस हेडकॉन्टेबल संजय लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल संदिप राऊत, संदिप आजबे, व महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा घोगरे असे आम्ही जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग गस्त करीत होतो. या दिवशी रात्री ११:१५ वाजताचे सुमारास हिमालय पेट्रोलपंप नगर रोड जामखेड येथे मालट्रक क्र. एम.एच.१५ सी.के.०१९१ हा नगर रोडकडे जात असताना दिसला. तो ट्रक संशयितरित्या वाटल्याने त्या ट्रकला थांबवून चालकास विचारपूस केली असता त्याने शिवाजी बबन गफाट, (वय ३७) वर्षे, रा. इंदापुर ता. वाशी. जि. उस्मानाबाद असे नाव सांगितले. वाहनात काय आहे असे विचारले त्याने सदर ट्रक मध्ये २१० तांदळाच्या गोण्या असल्याचे सांगितले. त्यास सदर तांदळाची पावती आहे का वगैरे सखोल चौकशी केली असता त्याने के. बी. वाघवकर वेट ब्रीज येथील पावती क्रमांक ४९१४ ही पावती दाखवली.

ज्यात गाडीसह एकुण वजन २२४५० किलो त्यात गाडीचे वजन ७४६० किलो व मालाचे वजन १४९९० किलो असल्याचे दिसुन आले. सदरचा माल अमर वसंत लवटे (वय ३१ वर्षे) धंदा-व्यापार, रा. ईंट ता. भुम.जि. उस्मानाबाद यांचे आडत दुकानातुन भरलेला असुन MAGR सुपा येथील कंपनीत घेवुन जात असल्याचे सांगितले. सदरील ट्रकमधील तांदुळ पांढऱ्या रंगाच्या गोणीत असल्याने त्याच्यी पाहणी करता सदरील तांदुळ जिवनावश्यक वस्तु अधिनियम मधील सार्वजिनक वितरणाचा असल्याबाबत संशय असल्याने पोलीसांनी सदर रात्री पोलीस ठाणे येथे आरक्षित केला व त्याबाबत चालकास लेखी समज दिली.

याबाबत दि. २५ नोव्हेंबर रोजी जामखेडचे तहसीलदार यांच्याकडे चौकशी केली असता हा बाबत कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच आपण संशयित वाहनाची अधिक चौकशी करून कार्यवाही करावी व सदरचा माल हा सार्वजनिक वितरणाचा असल्यास आम्हास कळावे असा अभिप्राय दिला. याप्रकरणी चालकाची आंम्ही पुन्हा विचारपुस केली असता सदरील तांदुळ हा केडगाव अ. नगर येथे घेवून जात असल्याचे सांगितले. त्यानंतर आंम्ही पोहेकॉ संजय लोखंडे यांनी तात्काळ दोन पंचाना पोलीस ठाणे येथे बोलावुन घेवुन आरक्षिक केलेला सदर ट्रक व तांदूळ याची पाहणी करुन मालट्रक क्र-एम.एच.१५ सी.के. ०१९१ ट्रकची अंदाजे किंमत ८ लाख व एकूण २१० गोणी तांदुळ वजन एकुण १४९९०किलो अडीच लाख रु. असा एकूण १० लाख ५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस काॅन्स्टेबल अरुण तुकाराम पवार, (वय-३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक नामे-शिवाजी बबन गफाट, वय ३७ वर्षे, रा. इंदापुर, ता. वाशी. जि. उस्मानाबाद याचे विरुध्द जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here