जामखेड तालुक्यात मोठा राजकीय भूकंप, राजुरी येथील राष्ट्रवादीच्या २०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

जामखेड (प्रतिनिधी) आ. प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जीवस्ती, घुलेवस्ती, बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातीलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांनी रविवारी ( ता.२०) चोंडी येथे आमदार प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात जाहिर प्रवेश केला.

राजुरीला राष्ट्रवादीचा मजबुुत बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. मात्र या बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पडले आहे. राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठा राजकीय भूकंप झाला. राजुरी गावातील बडे राजकीय प्रस्थ माजी सरपंच सुभाष काळदाते यांनी आपल्या २०० समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश करत जामखेड तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. हे सर्व जण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. 

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार राम शिंदे यांनी माजी सरपंच सुभाष काळदाते यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे भाजपात स्वागत केले. यावेळी आमदार राम शिंदे यांनी राजुरीकरांशी संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनल बहुमताने निवडून आणा, तुमच्या पाठीशी सर्व ताकद लावू, गावाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष आजीनाथ हजारे , भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, प्रविण चोरडिया, डाॅ अल्ताफ शेख, प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब ढगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

रविवारी (ता.२०) चोंडीत पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात राजुरीचे माजी सरपंच सुभाष काळदाते, राष्ट्रवादीचे युवा नेते संभाजी कोल्हे, माजी ग्रामपंचायत सदस्य नाना काळदाते, साहेबराव काळदाते, शिवदास कोल्हे, माजी उपसरपंच सुरेश खाडे, सोसायटी संचालक बाळासाहेब मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल काळदाते, जयराम काळदाते, रमेश काळदाते, रघुनाथ फुंदे, विक्रम काळदाते, राहुल खाडे, अक्षय काळदाते, आप्पा राऊत, गणेश काळदाते, पप्पू गायकवाड, अशोक काळदाते, सागर फुंदे, राहुल पुलावळे,राम काळदाते, राजु पवार, गोकुळ अवताडे, गोटू लटपटे, नितीन मोरे, सागर काळदाते, किरण घुले, वैजीनाथ डोळे, भरत डोळे, नासीर शेख, अक्षय सपकाळ, सोनू साळवे, विशाल शिंदे, राहूल काळदाते, गणेश काळदाते, आमित राऊत, सुधीर राऊत, अजय कोल्हे, विकास कोल्हे, लाला काळदाते, अनिरुद्ध सपकाळ, आबा सदाफुले, किशोर सदाफुले, सुधीर सदाफुले, साईनाथ मोरे, अविनाश रेडे, गणेश औताडे, शंकेश्वर कोल्हे, रघुनाथ काळदाते, अनिकेत काळदाते, अभिजित काळदाते, राम काळदाते, पोपट लटपटे, प्रदिप लटपटे, समाधान गायकवाड, शंकर डोळे, दादा खाडे, महेश खाडे, सर्जेराव घुले, रवि काळदाते, रमेश खाडे, किरण घुले, राजू मोरे, अंकुश खाडे, सुदाम जाधव, बाप्पू मोरे, विक्रम काळदाते, शहाजी पिसाळ, गणेश कोल्हे, महादेव गिरी, बापूसाहेब काळदाते, अशोक कोल्हे, आप्पा चव्हाण, सागर चव्हाण, विशाल चव्हाण, जयराम काळदाते, सुधीर कोल्हे, श्रीराम काळदाते, युवराज काळदाते, अक्षय सपकाळ यांच्यासह २०० कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी मध्ये गुलाम होऊन राहणारालाच सन्मान मिळतो,भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडे नेहमीच सर्वांनाच सन्मानाची वागणुक मिळते या गोष्टीचाही आम्ही अनुभव घेतला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आश्वासन देऊन , दिशाभूल करून , अमिष दाखवुन आमचे मतं घेतली. आम्हीही या गोष्टींना बळी पडलो , ही आमची खुप मोठी चुक होती. आम्हीही आमच्या सोबत असलेल्या मतदार जनतेला यांच ऐकुण आश्वासन दिली. विकासाचे स्वप्न दाखवले. परंतु प्रत्यक्षात अस काही झाल नाही. त्यामुळे सर्वसामान्य मतदार नाराज झाला.


मत घेताना सर्वांना जवळ घेतल निवडुन आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि पधादिका-यांनाच सोबत ठेवल जायच त्यांनाच विचारात घेतलं जात , आम्ही काही कामासाठी भेटायला गेलो तरी भाजपातुन आलेले आहेत. म्हणुन दुर ठेवलं जायचं , कामही त्यांनाच दिली जायची, आम्ही बोगस काम होत आहेत अशा तक्रारी केल्या तरी विकासकामात अडथळा आणु नका म्हणुन धमकावलं जायचं .कारण त्यांच्या जवळच्या लोकांना कामात भ्रष्टाचार करता यावा ,मनमानी पध्दतीने काम करता यावेतं,या गोष्टींची तक्रार आम्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडेही अनेक वेळा केली. तेही सांगायचे आम्हालाच विचारात घेतलं जात नाही तिथं तुम्हाला कोण विचारणार तुमचा तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही घेतलेला निर्णय योग्यचं असेल.

कायम अपमानास्पद मिळणा-या वागणुकीला कंटाळुन आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रा आ राम शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचं ठरवून भाजपात प्रवेश केला आहे.आमच्याकडुन जी चुक २०१९ ला झाली त्याची दुरूस्ती आम्ही २०२४ ला करूनच दाखवु. असा जाहिर निर्धार यावेळी राजुरी ,डोळेवाडी,एकबुर्जी,
घुलेवस्ती,बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातील उपस्थितांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया – १

भाजपा मध्ये जाहिर प्रवेश केल्यानंतर , आ प्रा राम शिंदे त्यांच्या नेतृत्वात गावाचा विकास करणार असल्याचा निर्धार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे.

– सुभाष काळदाते
माजी सरपंच राजूरी

प्रतिक्रिया – २

‘ राजुरी ,डोळेवाडी,एकबुर्जी,
घुलेवस्ती,बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.या सर्वांचे मी स्वागत केले आहे. या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देतानाच त्याभागातील प्रश्र प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.’

– आमदार प्रा.राम शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here