राज्य राखीव पोलीसदल कुसडगांव येथेच रहावे, कुसडगांव ग्रामस्थांनी घेतली आ प्रा.राम शिंदे यांची भेट

जामखेड (प्रतिनिधी) तालुक्यातील कुसडगाव येथे मंजूर असलेले राज्य राखीव पोलीस बल गट (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्र इतर ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र सदरचे केंद्र कुसडगाव या ठीकाणीच व्हावे यासाठी कुसडगाव येथिल ग्रामस्थांनी नुकतीच आ. प्रा राम शिंदे यांची भेट घेतली. तसेच काम सुरू असलेले केंद्र इतर ठिकाणी हलवु नये यासाठी मागणी करत निवेदन दिले आहे. या वेळी आ. प्रा राम शिंदे तुम्ही काळजी करू नका तुमच्या भावना शासन दरबारी पोहचवण्यात येतील असे अश्वासनान ग्रामस्थांना दिले.

गेल्या काही महिन्यांपासून कुसडगाव या ठीकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे बांधकाम सुरू असुन जवळपास 25 टक्के पूर्ण झालेले आहे, परंतु सदर केंद्राच्या जागे करिता ग्रामपंचायत कुसडगांव यांच्याकडून प्रा.राम शिंदे साहेब आमदार असताना 2017 मध्ये ठराव करून जवळपास 45 हेक्टर जमीन ही या एसआरपीएफ केंद्राकरिता देण्याचा ठराव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला होता. त्यानंतर कुसडगांव येथे या केंद्राचे काम देखील चालू झाले. परंतु काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली की कुसडगांव येथून केंद्र परत वरणगाव कडे स्थलांतरित करण्याचे आदेश व तशा काही हालचाली देखील सुरू झाल्याचे कळले.

कुसडगांव येथील सर्व गावकऱ्यांच्या वतीने सरपंच तसेच उपसरपंच सोसायटी चेअरमन व गावकऱ्यांच्या वतीने प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना निवेदन देले. सदर केंद्र कुसडगांव मध्येच व्हावे अशी मागणी करण्यात आली. सदर SRPF केंद्र हे कुसडगांव मध्ये झाल्यास गावातील शेतकऱ्यांना तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी आहेत. फळे, पालेभाज्या, दूध तसेच इतर लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू याची मागणी या ठिकाणी होणार आहे या बाबींची पुरवठा करण्यासाठी जवळील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. हीच मागणी घेऊन ग्रामस्थांच्या वतीने कुसडगांव चे सरपंच मा.शहाजी गाडे, उपसरपंच मा.नागेश कात्रजकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा.संजय बापू कार्ले, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मा.शरद कार्ले तसेच ग्रामपंचायत सदस्य पै. पप्पू कात्रजकर, युवराज गंभीरे, मधुकर खरात, वि.वि.सोसायटीचे चेअरमन मा.केशव कात्रजकर, मा.सरपंच भानुदास टिळेकर, अशोक गंभीरे, विठ्ठल कात्रजकर,प्रशांत कात्रजकर शैलेश कुलकर्णी, बाळासाहेब काकडे, रामभाऊ टिळेकर, गणेश गंभीरे, उमेश काकडे, सूरज राऊत, चंदू कार्ले, सागर काकडे, भरत कात्रजकर, अशोक कात्रजकर, विष्णू गंभीर, धनंजय राऊत, बाळासाहेब कार्ले तसचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

या नंतर कुसडगाव येथिल ग्रामस्थांनशी चर्चा करताना आ. प्रा राम शिंदे यांनी सांगितले की सदरचे केंद्र कुसडगाव याच ठिकाणी रहाण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्याची तुम्ही काळजी करु नका असे अश्वासन ग्रामस्थांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here