विज चोरीला विरोध केला, अरणगावच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण

जामखेड प्रतिनिधी

अरणगाव हद्दीतील पाटोदा (गरड) या ठीकाणी विज चोरी करताना आढळून आलेल्या आरोपीस जाब विचारण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत दिलेल्या फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे जामखेड उपविभागातील अरणगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता पुष्कराज हरीचंद्र मेंगाळ (वय 32) व वरिष्ठ तंत्रज्ञ – विठ्ठल शिवाजी खुणे हे दोघे काल दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आपल्या कार्यक्षेत्रातील पाटोदा (ग) या गावातील लाईटचा खांब कोठे जमिनीवर पडला आहे काय, कोणाचे फॉल्टी मीटर आहे काय याची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पाटोदा गरडाचे याठिकाणी विजेची अकडा टाकुन विजचोरी करत असल्याचे दिसून आले.

या नंतर सहाय्यक अभियंता पुष्कराज हरीचंद्र मेंगाळ (वय 32) व वरिष्ठ तंत्रज्ञ – विठ्ठल शिवाजी खुणे यांनी सदर आरोपीस, तुम्ही असे अनाधिकृत लाईट चा आकडा टाकून लाईट का वापरता असे विचारले असता संबंधित आरोपी म्हणाला की, तुम्ही मला विचारणारे कोण, तुम्हाला कारवाई करायची असेल तर शेतात जा, दुसर्‍यांचे लाईट चे आकडे पहा असे म्हणून मेंगाळ यांना घाण घाण शिवीगाळ केली त्यावर त्यांनी त्यांस समजावून सांगत आम्ही – शासकिय कामे करत आहोत. आम्हाला शासकिय कामे करताना कोणता अडथळा आणू नका असे सांगत असताना त्याने मेंगाळ यांची गचांडी धरून जमीनीवर खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण करून तु येथून कसा जातो, हे पाहतो असे म्हणून त्यांने आणखी दोन जनांना तेथे बोलावून घेतले.

त्यानंतर तेथे दोन इसम आले व त्यांनी काही एक विचार न करता त्या दोघांना घाण घाण शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली व इरफान पीरखान पठाण यांने टपरीजवळ पडलेल्या दगड हातात घेवून मेंगाळ यांच्या पाठीवर व हातावर मारहाण केली असून तेथून ते दोघेही कर्मचारी जवळच असणारे ओळखीचे गफार मद्देखान पठाण यांच्या दुकानावर पळत गेले व टपरीजवळ जावून थांबले त्यानंतर तेथे लोक गोळा झाल्याने तेथेही त्यांना शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण केली. तेथे उपस्थित गफ्फारभाई मद्देखाँन पठाण, गौतम हिरामण काळे व इतर लोकांनी सोडवा सोडव केली आहे. सदर ठिकाणी बरेच लोक गोळा झाल्याने तेथून वरील तिघेजण निघून जावू लागले व जाताना आम्हाला म्हणाले की, तुम्ही आज वाचलात, परत सापडलास तर जिवे मारतो अशी धमकी दिली.

या प्रकरणी विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पुष्कराज हरीचंद्र मेंगाळ वय 32 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी इरफान पीरखान पठाण, पीरखान ईस्माईल पठाण, सादफ ईब्राहीम पठाण सर्व रा. पाटोदा (ग), ता. जामखेड यांच्या विरोधात मारहाण व सरकारी कामात अडथळा आणला त्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here