

शहरातील अतिक्रमण काढताना नागरिकांवर अन्याय होणार नाही यांची काळजी घेऊन-खा. सुजय विखे-पाटील
जामखेड प्रतिनिधी
नव्याने होत असलेल्या जामखेड ते सौताडा महामार्ग होतांना अतिक्रमण काढताना शहरातील कोणत्याही नागरिकांवर अन्याय होणार नाही यांची काळजी घेऊन येत्या आठ दिवसात याबाबतच अहवाल सादर करण्याच्या सूचना खासदार डॉ सुजय विखे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जामखेड ते सौताडा होणाऱ्या महामार्गामध्ये शहरातून जाणाऱ्या कर्जत फाटा (पंचदेवालय) ते शासकीय दुध डेअरी या ठिकाणावरील रस्त्यांचे दोन्ही बाजूने अंतर कमी करावे. जेणेकरून जामखेड मधील कोणत्याही व व्यापारी, दुकान व घर कोणाचेही आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता अंतर कमी करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जामखेड येथील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांची भेट घेतली यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,नॅशनल हायवेचे अधिकारी आर बी जाधव ,सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थितीत होते यावेळी जामखेड येथील व्यापारी अशोक शिंगवी, आकाश बाफना,सुभाष भळगट, पिंटू बोरा,सुधीर जगताप, व शहरातील व्यापाऱ्यांच्या सहीचे निवेदन खासदार सुजय विखे पाटील यांना देण्यात आले. या बाबत खासदार सुजय विखे-पाटील यांनी त्वरित संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असुन अतिक्रमण काढते वेळी कोणाचे नुकसान न होता मार्ग कसा काढण्यात येईल याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू व काळजी घेऊ असे आश्वासन खा विखे यांनी दिले.







