विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देणारी
रत्नदीप संस्था जिल्ह्यातील पहिलीच शिक्षण संस्था.

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेचा उपक्रम.

जामखेड (प्रतिनिधी) रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या विविध महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देणारी रत्नदिप संस्था ही नगर जिल्ह्यातील एकमेव ठरली आहे.

रत्नदिप संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे व सचिव डॉ.वर्षा मोरे यांनी सामाजिक बांधिलकीतून केवळ संस्थेच्या कर्मचा-यांनाच नव्हे तर संस्थेच्याा विद्यार्थ्यांनाही विमा संरक्षण देवून, विद्यार्थ्यांप्रती आस्था आणि विश्वास दाखवला आहे. विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देणारी जिल्ह्यातील एकमेव शिक्षण संस्था ठरण्याचा बहूमान या संस्थेला मिळाला आहे.

सामाजिक बांधिलकी जपत रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या बावीसाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून,संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी संस्थेच्या कर्मचार्‍यांसह विद्यार्थ्यांनाही विमा संरक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला. यानिमित्त झालेल्या बैठकीस संस्थेच्या सचिव डॉ.वर्षा मोरे पाटील यांचेसह प्रशांत राळेभात,विकास लाळगे, विनोद निंबाळकर,विजय गिरमकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.विमा संरक्षणाच्या माध्यमातून संस्थेच्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार असून, त्याअंतर्गत वीस हजार रूपयांपर्यंत खर्चाचे आरोग्य विषयक उपचार देखील मोफत मिळणार आहेत.

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या ठीकाणी बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर ही संस्था गेल्या बावीस वर्षांपासून जामखेड-कर्जत तालुक्यात विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवित आहे. संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात बीएचएमएस, नर्सिंग व फार्मसी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असून, याठिकाणी राज्यातील विविध भागातील जवळपास बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

‘रत्नदीप’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सचिव डॉ.वर्षा मोरे पाटील या डाॅक्टर दांम्पत्याच्या मोठ्या कष्टातून तालुक्यातील पहिले वैद्यकीय शिक्षण देणारे शैक्षणिक संकुल जामखेडला उभे राहिले. संस्थेच्या वीस एकर जागेत प्रशस्त आणि भव्यदिव्य देखनी इमारत जामखेड- कर्जत रस्त्यावरुन जाणार्‍या-येणाऱ्यांचे लक्ष वेधते. याठिकाणी शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम ही राबविले जातात. तसेच विविध सार्वजनिक आपत्ती प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपण्यातही रत्नदीप शैक्षणिक संकुल आघाडीवर असते. यावर्षी दिवाळी उत्सवाचे औचित्य साधून संस्थेत काम करणाऱ्या बीएचएमएस, फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये व मौल्यवान भेटवस्तू देऊन अनोख्या पद्धतीने सन्मान करत, त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी गोड केली. या दाम्पत्याचा वाढदिवस हा एकाच दिवशी १६ नोव्हेंबर रोजी असुन, यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

रत्नदिप शैक्षणिक संकुलात कौटुंबिक वातावरण मिळत असुन, संस्थेचे डाॅ.मोरे दाम्पत्य रत्नदीप फॅमिलीचे पालक म्हणूनच काम करीत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकी रूपये एक लाख रक्कमेचा विमा उतरविण्याचा संस्थेने घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी उत्साहवर्धक व भावनिक आहे. आसे मत कॉलेज चे प्रा.डॉ.झेबिया गफ्फार शेख यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here