शेतकऱ्यांनो सावधान! जामखेड तालुक्यात लंपी स्कीन आजाराने २० दिवसात २६ जणावरांचा मृत्यू.

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड तालुक्यात लसीकरण होऊनही लम्पी स्कीन आजाराचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला गेल्या अडीच महीन्यात ८९७ जणावरे पॉझिटिव्ह अढळुन आली असुन ३४५ जणावरे सध्या ॲक्टीव आहेत. मात्र गेल्या वीस दिवसात २६ जणावरांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून मिळाली आहे.

जामखेड तालुक्यात लंपी स्कीन आजाराचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लसीकरण होऊनही लम्पी स्कीन आजाराच्या जणावरांची संख्या वाढत चालली आहे. जामखेड तालुक्यातील गायवर्गाची एकुण संख्या ५८ हजार ८९१ एवढी आहे. गेल्या आडीच महीन्यात जामखेड तालुक्यात ८९७ जणावरे पॉझिटिव्ह अढळुन आली आहेत. या मध्ये सध्या ३४५ ॲक्टीव रुग्ण आहेत. मात्र या महीन्यात लंपी स्कीन आजाराने जनावरांच्या मुत्यू चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. गेल्या वीस दिवसात एकुण २६ जणावरांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

मुत्यूसंख्येत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. लसीकरण केलेले असतानाही अजार आटोक्यात आलेला नाही. या आजारावर अद्याप औषध उपलब्ध नाही. त्यामुळे लसीकरण व जनावरातील रोगप्रतिकारक शक्ती यांवरच काही अवलंबून आहे. त्यामुळे जामखेड पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून सध्या लसीकरणावर भर दिला जात असुन सध्या जामखेड तालुक्यात शंभर टक्के गायवर्गाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

जामखेड तालुक्यात ज्या जणांवरांचे लसीकरण झालेले नाही अशा जणांविरांचा शोध सुरू आहे. तालुक्यात ज्या ठिकाणी लंपी स्कीन आजाराचे जणावरे आढळून येतील त्यांनी तातडीने जामखेड येथिल पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत उपचार करुन घ्यावेत तसेच ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह जनावरे आढळून येत आहेत त्या ठिकाणी देखील आम्ही उपचारासाठी जात आहोत. शेतकऱ्यांनी आपला गोठा व परीसर स्वच्छ ठेवावा व आपल्या जणावरांची काळजी घ्यावी आसे आवाहन जामखेड पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संजय राठोड यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here