

जिल्ह्य़ातील गुन्हेगारीचा बिमोड करणार – पोलीस अधीक्षक राकेश ओला
जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी उपाययोजना करण्यात येतील. सध्या जिल्ह्य़ात अवैद्य धंद्यांविरोधात मोहीम सुरू आसुन ती आनखी वाढवण्यात येईल. तसेच जिल्ह्य़ातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यात येईल असे मत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जामखेड दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सप्टेंबर २०१४ मध्ये नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली होती. या पुर्वी ते नागपूर या ठीकाणी कार्यरत होते. त्या नंतर नगरचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून अहमदनगर नगर जिल्ह्य़ाचा राकेश ओला यांची मागिल महीन्यात पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांनी प्रथमच जामखेड येथिल पोलीस स्टेशनला भेट घेऊन परीस्थितीचा अढावा घेतला या वेळी त्यांची पत्रकारांनी भेट घेतली. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, कर्जत चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, जामखेड चे पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, यांच्या सह पत्रकार उपस्थित होते.

या वेळी पत्रकारांनी जामखेड तालुक्यातील माहिती देताना सांगितले की जामखेड तालुका चार हद्दीच्या सीमेवर आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सध्या खर्डा व जामखेड पोलीस स्टेशनला कर्मचारी संख्या कमी असल्याने वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. त्यानंतर पुढे पत्रकारांशी बोलताना राकेश ओला म्हणाले की जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा, यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे आसे पत्रकारांशी बोलताना सांगितले.







