

गायरान जमिनीवरील कुटुंबीया सोबत राहुन कायदेशीर लढाई लढणार- प्रा सचिन सर
जामखेड प्रतिनिधी
सोनेगाव येथील गायरान जमीनीवर वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबियांच्या घराला हात लावून देणार नाही. या गोरगरीबांच्या या लढाईत त्यांना सोबत घेऊन कायदेशीर लढाई लढणार आहे असे मत प्रा.सचिन सर गायवळ यांनी केले आहे.

पुढे पत्रकारांशी बोलताना प्रा सचिन गायवळ सर म्हणाले की प्रशासनाने गरीब जनतेला नोटीस देऊन जो मानसिक व अर्थिक त्रास देत आहे ते थांबला पाहीजे, गायरान जमिनीवर वास्तव्यास नसणार्याही काही लोकांना विनाकारण नोटीस दिल्या जात आहेत. तो त्रासही लवकरात लवकर थांबवुन सरकार आणि स्थानिक पातळीवरील शासकीय यंत्रणेने या कुटुंबियांना आधार देण्यासाठी योग्य ती पावले उचलावित.

गायरान जमिनिविषयी कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा म्हणुन सरकारने कायदेशीर बाजु मांडायला हवी. कष्टकरी गोरगरीब जनतेवर होणारा हा खुप मोठा अन्याय आहे गायरान जमिनीवर वास्तव्यास असणारे सर्व भुमिहीन, मोलमजुरी करून पोट भरणारे गरीबच आहेत, त्यामुळे सरकारने त्यांच्या विषयी संवेदना दाखवुन त्यांच्यावतीने कोर्टात आपली बाजु मांडावी व गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या जनतेला आधार द्यावा त्यांचे घर असलेली जागा त्यांच्या मालकी हक्काची करून द्यावी.

शासकीय गायरान जमीन नाममात्र म्हणजेच फुकट कंपन्यांना भाडेतत्वार देऊन पैसे कमविण्यासाठी किंवा पैसे मिळण्यासाठी गायरान जमीनीवरील गोरगरीबांचे घर पाडुन संसार उध्दस्त करणे हा त्यांच्यावर केलेला खुप मोठा अन्याय , हा अन्याय सर्वसामान्य जनता कधीही सहन करणार नाही आम्ही जनतेसोबत राहुन कायदेशीर लढाई लढु असे सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन सर गायवळ म्हणाले.

शहरात महत्वाच्या ठीकाणी असलेल्या शासकीय जागेवर सरकार श्रीमंत लोकांना जागा मोफत देऊन स्वस्तात घर बांधुन देत आणि ग्रामीण भागातील महत्व नसलेल्या गायरान जमीनीवर मोलमजुरी करून स्व:खर्चाने बांधलेली घरे उध्वस्त करत आहेत. हा सर्वसामान्य कष्टकऱ्यांना केलेला खुप मोठा भेदभाव आहे , हा भेदभाव थांबला पाहीजे गोरगरीब भुमिहीन जनतेला न्याय मिळाला पाहीजे ही जबाबदारी सरकारने घेऊन यावर योग्य तो मार्ग निघायला हवा.
गायरान जमीनीवर वास्तव्यास असणार्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या घरांच्या हक्काच्या जागा त्यांच्याचं नावावर करुन द्याव्यात ही सरकारकडे मागणी करणार असल्याचे प्रा.सचिन सर गायवळ यांनी सांगितले आहे.






