एन.टीव्ही.च्या दिपावली विशेषांकाचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

ना.दिपक केसरकर, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून कौतुक

अहमनगर – महाराष्ट्राची आग्रगण्या व्रत्तवाहिनी, जनमानसाचा प्रतिबिंब म्हणून ओळखली जाणारी मराठी वृत्तवाहिनी एन. टीव्ही न्यूज मराठीच्या दीपावली विशेषांक 2022 चा ‘वास्तव-दी रिऍलिटी’ या अंकाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री आ.बच्चू कडू यांच्या हस्ते मोठ्या थाटात मंत्रालयात प्रकाशन संपन्न झाले.


सालाबाद प्रमाणे यंदाही एन. टीव्ही वृत्तवाहीनीने आपल्या असंख्य प्रेक्षक तथा वाचकांसाठी देशातील वास्तव चित्र रेखाटत ‘वास्तव द रिऍलिटी’ या शीर्षकाखाली दीपावली अंक प्रकाशित केला. या अंकाचे प्रकाशन मुंबई-मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू, उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, सातलिंग स्वामी आणि संपादक इकबाल शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी विविध विभागाचे सचिव, स्वीय सहाय्यक यांच्यासह विविध मान्यवर, एन. टी.व्ही विभागीय प्रतिनिधी सचिन बिद्री, उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी अय्युब शेख आणि राज्यभरातून आलेले दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपास्थित होते.

दरम्यान या प्रकाशन सोहळ्यात एन. टीव्ही च्या माध्यमातून पत्रकारितेसह सचिन बिद्री यांचे होणारे सामाजिक कार्य, विशेषत: बालविवाह रोखुन मुली व मुलींच्या पालकांमध्ये शिक्षणाबाबत जणजागृतीबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व बच्चू कडू यांनी कौतुक करीत पाट थोपटली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here