
जामखेड येथे रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम शिऊरच्या वतीने ३ दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील शिऊर येथील रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम यांच्या वतीने तीन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असुन या व्याख्यानमालेचा समाजातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम मठाचे पदाधिकारी यांचे वतीने करण्यात आले आहे.

या व्याख्यानमालेचे हे १५ वर्षे असून २०२२ मध्ये प्रामुख्याने देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आवर्जून या व्याख्यानमाला आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. जामखेड शहरातील गोरोबा कुंभार चित्रमंदिर येथे होणाऱ्या या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प दि. १५ नोव्हेंबर रोजी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथील कार्यकर्त्या श्रीमती जानवी केळकर या गुंफणार असून “राष्ट्र उभारणीत महत्त्व कुटुंबाचे” हा त्यांचा विषय आहे, दुसरे पुष्प दि. १६ नोव्हेंबर रोजी स्वामी ज्ञानगम्यानंदजी महाराज रामकृष्ण मठ ,नागपूर हे ” स्वामी विवेकानंद नसतेच तर..?” विषयावर गुंफणार आहेत तर दि. १७ नोव्हेंबर रोजी स्वामी ज्ञानगम्यानंदजी महाराज रामकृष्ण मठ ,नागपूर हेच “मला अध्यात्मिक व्हायचंय!” या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत. दि. १५, १६ व १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ : ०० ते ८ :०० वाजेच्या दरम्यान शहरातील संत गोरोबा चित्र मंदीर या ठीकाणी ही व्याख्यानमाला होणार आहे.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम शिऊर मठाचे अध्यक्ष उमेश देशमुख, उपाध्यक्ष अशोक पितळे, सचिव संजय गुंदेचा व संचालक मंडळाने केले आहे.






