
जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन ची कार्यकारणी जाहिर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन ची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी मध्ये अध्यक्ष म्हणून तात्याराम बारीकराव बांदल, जामखेड
उपाध्यक्ष पदी अनिलकुमार बोथरा जामखेड, तर सचिवपदी किरण वाघमारे खर्डा यांची निवड जाहीर करण्यात आली.

केमिस्ट असोसिएशन च्या इतर पदांच्या निवडी देखील जाहीर करण्यात आल्या या मध्ये खजिनदार म्हणून महेश नारके जामखेड,
ग्रामीण उपाध्यक्ष. वैभव मोहळकर नान्नज, ओमप्रकाश गुलाटी ट्रस्ट सदस्य, फैसल खान जामखेड, यांच्या निवडी करण्यात आल्या. या वेळी जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसह हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

विघ्नहर्ता हॉस्पिटल कडुन अध्यक्ष तात्याराम बांदल यांचा सत्कार
विघ्नहर्ता हॉस्पिटल चे चेअरमन
डाॅ. अनिल गायकवाड, डॉ. प्रदीप काञजकर, डॉ बाळासाहेब मुळीक, डॉ प्रदिप कुडके, डॉ प्रशांत वारे, डॉ सागर शिंदे व विघ्नहर्ता हाॅस्पिटल सर्व स्टाफ यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन निवडणूकिमंध्ये विजयी झालेले उमेद्वार तात्याराम बांदल यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.







