अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करुन मंत्रीपदावरुन हकालपट्टी करा

जामखेड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस झाली आक्रमक

जामखेड प्रतिनिधी

शिंदे गटाचे नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल शिवराळ भाषेत वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण तापले असतानाच जामखेड येथे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करुन हकालपट्टी करा अन्यथा त्यांना रस्त्यावर फीरु देणार नाही असा इशारा आज राष्ट्रवादी काँग्रेस ने पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केला आहे.

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. सत्तार यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस स्टेशनला निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की राजकीय मागलेपणा कसा असतो ते वरील घटनेवरून दिसुन येत आहे. सध्याचे सरकार हे खोके सरकार आहे. एखाद्याच्या लग्नात गेलो तरी आम्हाला खोक्यावाले आले म्हणून चिडवतात आसे देखील आ. बच्चू कडू यांनी बोलुन दाखवले होते. खा सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना देखील चुकीचे उत्तर दिले होते. त्यावेळी ते म्हणाले की त्यांना मी बोललेलो वाक्य लागले असेल तर त्यांना पन्नास खोके मी देतो आसे ते म्हणाले.

अब्दुल सत्तार यांनी महीलेला अपशब्द वापरला त्या कलमाद्वारे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सत्तार हे भाजपाच्या पाठींब्यावर बोलत आहेत. नुसता गुन्हा दाखल होऊन उपयोग नाही तर मंत्रीमंडळातुन त्यांना हाकलून दिले पाहिजे.

आब्दुल सत्तार यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राजमाना घ्यावा एका जबाबदार मंत्र्याने खालच्या पातळीवरची भाषा वापरली त्यांना मंत्री मंडळातुन हाकलट्टी करावी. हे सत्तार सत्तार नसुन ते कुत्तार आहेत. अशी देखील टीका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केली.

सत्तेची मस्ती कशी असते खुर्चीवर बसुन त्यांचे भान हरपले आहे. याचे उदाहरण आहे. चांगल्या मानसाची अवहेलना करण्याचे काम अब्दुल सत्तार यांनी केले आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा. राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय संयमाने राजकारण करते कारण आम्हाला मा. शरदचंद्र पवार यांची शिकवण आहे. वारंवार या सरकारचे मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत. हे थांबले नाही तर आम्ही मंत्र्यांना रस्त्यावर फीरु देणार नाही अशा संतप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केल्या.

या नंतर जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, माजी सभापती संजय वराट, शरद शिंदे, नगरसेवक मोहन पवार, राजेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, पवनराजे राळेभात, अमित जाधव, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, हरिभाऊ आजबे, अवधुत पवार, रमेश आजबे, शहाजी राळेभात, बाळासाहेब खैरे, सचिन घुमरे, राजु गोरे, अमोल गिरमे, प्रकाश सदाफुले , हर्षल डोके, इस्माईल सय्यद, वसीम सय्यद, बिलाल शेख, सुरज राळेभात, अमर चाऊस, महेश राळेभात, अमोल लोहकरे, काका चव्हाण, जुबेर शेख, वैजीनाथ पोले, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here