
कुसडगाव ग्रामपंचायतच्या वतीने केमिस्ट चे अध्यक्ष तात्याराम बांदल यांचा सत्कार
जामखेड प्रतिनिधी
आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यात समृद्ध गाव अभियान राबविण्यात येत आहे. कुसडगाव चे सरपंच शहाजी गाडे व इतर गावचे सरपंच यांनी मिळून नुकतीच कुसडगाव व सरदवाडी या ठीकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सरदवाडी चे भुमिपुत्र व जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष तात्याराम बांदल यांचा या ठीकाणी सत्कार करण्यात आला.

आमदार रोहित (दादा )पवार व जामखेड तालुक्यातील दौरा करून आलेले सर्व ग्रामस्थ प्रत्यक्ष प्रत्येक रविवारी एक गाव निवडून तेथे जाऊन वृक्ष लागवड, स्वच्छता ,मनरेगा विषयी जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे . हे काम सर्वांनी मिळून आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन करणार आहेत असा संकल्प केला आहे .
या अनुषंगाने नुकतेच सरदवाडी, कुसडगांव ग्रामपंचायत या गावाचे सरपंच शहाजी गाडे पाटील व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्यातून कुसडगाव सरदवाडी या ठीकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सरदवाडी चे भुमिपुत्र व नुकतेच निवडणुकीत विजयी झालेले जामखेड तालुक्यातील केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष तात्याराम बारीकराव बांदल यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातू सरपंच हनुमान बारगजे ( मोहरी ) राष्ट्रवादी युवा नेते रामहारी गोपाळघरे ( मोहरी ), सिद्धेश्वर लटके (शिऊर), काकासाहेब चव्हाण (सावरगाव), श्रीकांत लोखंडे ( खर्डा ), शरद जगताप ( घोडेगांव ), भीमराव कापसे ( मोहा) , बाळासाहेब खैरे (पाडळी) , किरण पवार (पाडळी), रावसाहेब जाधव ( नाहूली ) , निलेश पवार (बावी ) , भरत ढाळे ( तेलंगशी ) , नंदकुमार आढाव (धानोरा ) , गणेश कोल्हे (राजूरी ), किरण रेडे (रेडेवाडी ) , प्रमोद डेडे ( रेडेवाडी ), रविराज पाटील (जातेगांव ), प्रदिप मुरकुटे (फक्राबाद ), प्रशांत वारे ( बांधखडक ) अविनाश मस्के साहेब, गावातील तरुण बांधव, ग्रामस्थ , शाळेतील मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी वरील उपस्थित सर्वांनी सरदवाडी , कुसडगांव ग्रामपंचायत या ठीकाणी उपस्थित राहून उत्साहात वृक्षारोपनाचा कार्यक्रमपार पाडला .





