

डॉ भगवान मुरुमकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करु -युवा नेते नागराज मुरुमकर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड चे माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. मात्र त्यांच्यावर सध्या होत आसलेले आरोप खोटे असुन ज्या घटनेत डॉ भगवान मुरुमकर यांचा संबंध नाही त्या घटनेत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे त्यामुळे जर डॉ भगवान मुरुमकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल असे मत युवा नेते नागराज मुरुमकर यांनी केला आहे.

जामखेड चे माजी सभापती भगवान (दादा) मुरुमकर यांच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर जे लोक प्रसार माध्यमांमध्ये येऊन भगवान दादा मुरुमकर यांचे नावे घेत आहेत त्यांनी सर्व पाश्र्वभूमीची सत्येता तपासुन पहावी कारण ज्या घटने मध्ये भगवान दादा मुरुमकर यांचा कसल्याही संबंध नाही अशा व्यक्तीने जर भगवान (दादा) मुरुमकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत .आंधुरे यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्या मध्ये भगवान (दादा) चा पोलिस प्रशासनावर व न्याय व्यवस्थेवर पुर्ण पणे विश्वास आहे.

गेल्या 22 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक लोक भेटले त्या प्रत्येक व्यक्तीला तो गुन्हेगार आहे का? तो काय करतो? तो कुठला आहे? हे तपासुन त्यांच्याशी ओळख करायला पाहिजे होती का हा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी कायम जनतेमध्ये उपलब्ध राहुन अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रमाणिक पणे प्रयत्न डॉ भगवान (दादा) मुरुमकर यांनी केले आहेत. भगवान (दादा) मुरुमकर यांचा जनतेवर व न्यायव्यवस्थेवर पुर्ण पणे विश्वास आहे जो माणूस सर्वसामान्य जनतेला जामखेड मध्ये आल्यावर त्यांच्या हक्काने आपला माणूस म्हणून काम करत आहेत हे सगळ्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे डॉ भगवान (दादा) मुरुमकर यांना कोणी कीतीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही .आणि ज्यांना बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे अशा लोकांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल असे मत युवा नेते नागराज मुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले .







