पोखरी जवळील पुल बनला मृत्यूचा सापळा

पुलाच्या कठड्यासाठी आकाश बाफना यांनी घेतला पुढाकार

जामखेड प्रतिनिधी

नगर जामखेड रोडवरील पोखरी जवळ असलेल्या वळणावरील पुलाला कठडे नसल्याने सध्या हा पुल मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या पुलाला कठडे नसल्याने व झाडाझुडपांनमुळे या पुलाचा अंदाज कोणाला येत नाही त्यामुळे या घटनास्थळावर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तीन दिवसांपूर्वीच जामखेड चे प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांना देखील या पुलामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

वाहतुकीच्या सोयीसाठी नदी, नाल्यांवर पूल बांधण्यात येतो. सुरक्षेसाठी कठडेही लावण्यात येतात. मात्र, नगर -जामखेड महामार्गावरील पोखरी जवळील पूल कठड्यांविना आहेत. नागरिकांचा या पुलावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे. पुढाकार मात्र कुणीही घेत नसल्याने प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे हा पुल वळण रस्त्यावर असून या ठिकाणी गतीरोधक नसल्याने अनेक वाहने भरधाव जातात व अपघाताची शक्यता वाढत आहे. महामार्गावर प्रचंड चढ-उतार, मार्गाचे काम करताना न भरलेले साइड पट्ट्या , वळणावर वाढलेली झाडेझुडपे यामुळे झाकले गेलेले सूचना फलक यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.

वारंवार अपघात होऊन या ठीकाणी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असले तरी या पुलाकडे कोणी लक्ष देत नसल्याने जामखेड येथील बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना यांनी पुढाकार घेतला असून या पुलावर कठडे बसवून देण्यासाठी बॅरिगेटिंग कामासाठी मोजमापास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना यांनी दिली आहे.

मागिल काही दिवसांपुर्वीच जामखेड येथिल भांड्याचे व्यापारी मयत महेंद्र बोरा यांचे याच पुलावरून गाडी खाली गेल्याने या रस्ता अपघातात निधन झाले. पोखरीपासून १०० मीटर अंतरावरील पुलामुळे ठिकाणी यापूर्वीही खूप वेळा मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे या परिसरात दोन्ही बाजूंनी लोखंडी बेरिकेटिंग व १०० मीटर वर झिकझॅक प्रकारचे स्पीड ब्रेकर टाकने गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यामध्ये असे प्रसंग तेथे होणार नाहीत. यासाठी आम्ही याठिकाणी दुरुस्ती व आवशक त्या उपाययोजना करणार असून त्या अनुषंगाने कामाला सुरुवात केली असल्याचे बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here