बांधखडक ग्रामस्थांनी केली आरोग्य मंत्र्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी

जामखेड प्रतिनिधी

बांधखडक परिसरातील लोकसंख्येचा विचार व ग्रामीण भागातील रुग्णांचा विचार करून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे, अशी मागणी बांधखडक येथील रहिवाशांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बांधखडक हे गाव खर्डा व जामखेड शहरापासून दुर आहे. त्यामुळे या ठीकाणाहुन बाहेरगावी रुग्ण घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण होत आहे. तसेच ग्रामस्थ व रुग्णांचा वेळ वाचावा व गावातच प्राथमिक उपचार मिळावे या प्रमुख मागणीसाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना बांधखडक येथील ग्रामस्थांनी आरोग्य केंद्र व्हावे यासाठी निवेदन दिले.

काही दिवसांपूर्वी मा मंत्री आ प्रा राम शिंदे साहेबांनी चौंडी येथे आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब आले होते. या वेळी त्यांना बांधखडक या ठीकाणी आरोग्य केंद्र होण्यासाठी निवेदन देण्यात आले. भाजपा ता. सरचिटणीस केशव आण्णा वनवे, सरपंच राजेंद्र कुटे, उपसरपंच तानाजी पाटील, चेअरमन सखाराम वनवे, युवा नेते मंगेश वारे, बालाजी वनवे, रामचंद्र चव्हाण, नंदु सानप, सुशेन चव्हाण, अर्जुन दराडे, रोहीत वनवे, विजय वारे, यांनी ग्रा, पं, ठरावाद्वारे प्रा. आरोग्य केंद्राची मागणी केली आहे, बांधखडकची भौगोलिक परिस्थिती व दळणवळणामुळे आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात, यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज असल्याचे, सांगितले. त्यामुळे परिसरातील लोकसंख्येचा विचार करून बांधखडक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे, अशी मागणी बांधखडक येथील रहिवाशांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here