जामखेड शहरात आगमन होताच कु. आंचल चिंतामणी केले ढोल ताशांच्या गजरात स्वागत

चेन्नई येथील राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत कु. आंचल अमित चिंतामणी हीने पटकाविले सुवर्ण पदक

जामखेड प्रतिनिधी

इंटरनॅशनल फ्लोअरबाॅल फेडरेशन (IFF) अंतर्गत असलेल्या तामिळनाडू फ्लोअरबाॅल असोसिएशनच्या वतीने चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत कु. आंचल अमित चिंतामणी हीने सुवर्ण पदक पटकाविले आहे. या गौरवास्पद कामगिरीमुळे तीचे जामखेड शहरात आगमन होताच आमित चिंतामणी मित्र मंडळाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. कु. आंचल ही नगरसेवक अमित चिंतामणी यांची कन्या आहे.

इंटरनॅशनल फ्लोअरबाॅल फेडरेशन (IFF) अंतर्गत असलेल्या तामिळनाडू फ्लोअरबाॅल असोसिएशनच्या वतीने चेन्नई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत कु. आंचल अमित चिंतामणी हीने सुवर्ण पदक पटकाविले. आंचल चिंतामणी ही सुवर्ण पदक पटकावुन जामखेड शहरात दाखल होताच तीचे अमित चिंतामणी मित्र मंडळाच्या वतीने जयहिंद चौक व शनिचौक या ठीकाणी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी फटाक्यांच्या आतषबाजीने तीचे स्वगत करुन औक्षण करण्यात आले व पुढील वाटचालीस तीला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here