महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केला तात्याराम बांदल यांचा केला सन्मान

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन चे नवनिर्वाचित अध्यक्ष तात्याराम बांदल यांना महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पासाहेब) शिंदे यांनी मंबई या ठीकाणी भेटुन शुभेच्छा दिल्या. तसेच जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनला जे सहकार्य लागेल ते करण्याचे अश्वासन दिले.

जामखेड तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन च्या झालेल्या निवडणुकीत नुकतेच तात्यासाहेब बांदल हे विजय झाले. यानंतर जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष तात्याराम बांदल यांना मुंबईला बोलवून महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष मा.आ.जगन्नाथ (आप्पासाहेब) शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. तात्यासाहेब यांची जामखेड तालुका केमिस्ट संघटनेसाठी असणारी धरपकड पाहुन आप्पासाहेबांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.

जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष तात्याराम बांदल यांनी बोलताना सांगितले की मेडिकल व्यावसाय करत असताना मेडिकल व्यावसायिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी खंबीरपणे उभे रहाणार. तसेच जेष्ठ केमिस्ट बांधवांचे मार्गदर्शन घेऊन तरुणांना सोबत घेऊन केमिस्ट बांधवांची कामे करणार आहे असे सांगितले.

या वेळी मंबई येथील भेटी दरम्यान मेडिकल व्यावसायिक अनिल बोथरा, अंगद मुळीक, गणेश बामदाळे, विकास आजबे, कीरण वाघमारे व सागर बाबर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here