
जामखेड शहरातील प्रसिध्द भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघाती निधन
नगर जामखेड रोडवरील पोखरी जवळ कार उलटली तीन गंभीर जखमी
जामखेड प्रतिनिधी
राजस्थान येथुन देवदर्शन करुन जामखेडकडे परतणाऱ्या जामखेड शहरातील प्रसिध्द भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा यांच्या चारचाकी वाहनास नगर जामखेड रोडवरील पोखरी जवळ कार पुलाच्या खाली गेल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या समवेत आसलेले कुटुंबातील तीन जण या अपघातात जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले आहे.


जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी म्हणून ओळख असलेले भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा वय 58 वर्षे रा. जामखेड हे काही दिवसांपुर्वीच आपल्या कुटुंबासमवेत राजस्थान या ठीकाणी देवदर्शनाला गेले होते. ते आज रात्री विमानाने पुणे विमानतळ या ठीकाणी आल्यानंतर त्याच्या चारचाकी गाडीने ते सर्वजण त्यांच्या एम. एच.16 ए. टी 8807 या चारचाकी वाहनाने आपल्या कुटुंबासमवेत पुण्याहून पहाटे जामखेड कडे निघाले होते. त्यांची गाडी आज दि 2 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नगर जामखेड रोडवरील पोखरी फाट्याजवळ आली होती. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या पुलावरून अचानक त्यांची चारचाकी गाडी पलटी होऊन भिषण अपघात झाला.

या अपघातात प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे निधन झाले तर त्याच्या गाडीमध्ये आसलेले त्यांची पत्नी रेखा महेंद्र बोरा, वय 52, सुन जागृती भुषण बोरा वय 28, नात (मुलगी) लियाशा भुषण बोरा वय 6 हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल या ठीकाणी दाखल करण्यात आले होते. त्या नंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. तर त्यांचा मुलगा भुषण महेंद्र बोरा वय 34 हे कीरकोळ जखमी असल्याने उपचार घेऊन त्यांना घरी सोडण्यात आले . मयत महेंद्र बोरा यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात दुपारी शवविच्छेदन करण्यात येणार आसुन सायंकाळी पाच तपनेश्वर अमरधाम या ठीकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मयत महेंद्र बोरा हे व्यापारी जितेंद्र बोरा यांचे बंधु होते. ते अतिशय मनमिळावू होते. त्यांच्या निधनाने व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त केली आहे.







