
सुरत चेन्नई ’ महामार्गामुळे अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 47 गावातील शेतकऱ्यांच्या घरी येणार आर्थिक गंगा,
शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार 800 कोटी रुपये जमा
अहमदनगर : कुठल्याही देशाच्या विकासामध्ये रस्ते, रेल्वे यासारख्या दळणवळणाचे साधने व त्या दृष्टिकोनातून लोहमार्ग व महामार्गांचा विकास खूप महत्त्वाचा असतो. जर आपण यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळावी व दळणवळण क्षेत्र अधिक परिणामकारक व्हावे यासाठी राज्य सरकार देखील विविध प्रकारचे मेगा प्लान तयार करत आहे.

कारण तुमचा पायाभूत सुविधा जेवढ्या भक्कम आणि प्रभावी असतील तेवढाच विकासाला देखील प्रभावीपणे वळण मिळते. यामध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यातील विकासाला गती देण्यासाठी राज्यात तब्बल 5267 किलोमीटरचे नवीन द्रुतगती महामार्ग तयार करण्याचा मेगा प्लान तयार केला.

त्याचाच एक भाग म्हणून एक महत्त्वाचा आणि महाराष्ट्रातील बऱ्याच भागाच्या विकासाला कारणीभूत ठरेल असा एक आणि गुजरात आणि आंध्र प्रदेश या दोनही महत्त्वपूर्ण राज्यांना जोडणारा सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधून जाणार असल्याने यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडसह पाच तालुक्यातील जवळजवळ 47 गावामधून जाणार असल्याने यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहणापोटी या 47 गावातील शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे.

सुरत–चेन्नई महामार्गाचा एकंदरीत प्लान आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील मार्गक्रमण
जर आपण या महामार्गाचा विचार केला तर हा सुरत होऊन नाशिक मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या चौरकोठे पासून जाणार आहे. या ठिकाणाहून तो राहुरी, राहता व नगर तालुक्यातून हा राष्ट्रीय महामार्ग पुढे जाणार आहे. साहजिकच आहे की महामार्गाचे कामासाठी जमिनीचे भूसंपादन ही खूप महत्त्वाचे बाब असते. या अनुषंगाने राहुरी तालुक्यातील पाच गावे सोडली तर इतर तालुक्यातील गावातील शेत जमिनीच्या गटांची मोजणी पूर्ण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 100 किमीचे अंतर या महामार्गाचे असणार आहे.

जर आपण या महामार्गाची मागची पार्श्वभूमी पाहिली तर 1 डिसेंबर 2021 रोजी या राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आली होती व त्यासाठी पाच महिन्यात 850 हेक्टर क्षेत्र भूसंपादित होणार असून त्या जमिनीच्या मोबदल्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 800 कोटींचा मोबदला जमा करण्यात येणार आहे.
कोणत्या तालुक्यातील किती गावांचा आहे यामध्ये समावेश?
जर आपण सुरत-चेन्नई महामार्गाचा विचार केला तर नगर जिल्ह्यातून हा जवळ जवळ 100 किलोमीटर अंतराचा असणारा असून यामध्ये राहता, राहुरी, संगमनेर, जामखेड तसेच कर्जत आणि अहमदनगर इत्यादी तालुक्यातील 47 गावांचा समावेश आहे.

जर आपण तालुका निहाय गावांची संख्या पाहिली तर राहता तालुक्यातील पाच, संगमनेर तालुक्यातील 13, राहुरी तालुक्यातील 19, नगर तालुक्यातील 10 अशा एकूण 42 गावांच्या लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादनासाठी मोजणी पूर्ण करण्यात आली आहे.

अशा पद्धतीने मिळणार शेतकऱ्यांना मोबदला
जर आपण या महामार्गासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादनाचा विचार केला तर आता ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असून यामध्ये फक्त राहुरी तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे मोजणी बाकी आहे. त्याचे कारण म्हणजे या पाच गावात राहते घरे तसेच बागायती जमीन या महामार्गासाठी भूसंपादित करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त मोबदला मिळावा यासाठी या भूसंपादनाला विरोध केला आहे.

परंतु या दृष्टिकोनातून जर विचार केला तर रेडी रेकनर दराच्या सरसकट चारपट मोबदला या गावातील शेतकऱ्यांना मिळू शकतो असा एक अंदाज आहे. त्यामुळे याबाबतीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या महामार्गाची 3डी अधिसूचना देखील जारी करण्यात येणार आहे.

त्यानंतर महसूल प्रशासनाचे प्रांताधिकारी जमिनीचे निवाडे करतील. हे प्रक्रिया बरीच वेळखाऊ असल्यामुळे काही कालावधीनंतर यासाठीचे दर निश्चित केले जातील व शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल. नंतर हे क्षेत्र ताब्यात घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असल्याचे देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची उपमहाप्रबंधक प्रफुल्ल दिवाण यांनी सांगितले आहे. या सगळ्या प्रक्रियेसाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुरत चेन्नई महामार्गाच्या कामाला गती मिळेल व प्रत्यक्ष बांधकामाला 2023 पासून सुरुवात होणार आहे.
या गावांमधून जाईल हा महामार्ग
हा महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून 100 किमी अंतराचा असणार असून यामध्ये जर आपण संगमनेर पासून विचार केला तर चिंचोली गुरव, तळेगाव, कासारे, गोगलगाव, वडझरी, सदतपूर, सोनगाव आणि हसनपूर तसेच
राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाजवळून खडांबे, वांबोरी, मांजरसुंबा व नगर शहराजवळ चांदबिबी महाला जवळून जाणार असून पुढे बरदरी, सोनेवाडी, पारगाव भातोडी, भातोडी पारगाव, पारेवाडी, चिंचवडी पाटील आणि आठवड मधून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे.

बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यातील नांदूर, वागळूज, बालेवाडी, कुंभेफळ, चिंचोली, शिरपूर, टाकळ अमिया, नायगाव चोऊभा, केळसांगवी, धिरडी, इमानगाव, चिखली, खानापूर, वाळुंज, पारगाव जोगेश्वरी या गावातून पुढे जामखेड तालुक्यामध्ये प्रवेश करणार असून
जामखेड तालुक्यातून डोणगाव, पाटोदा, अरणगाव, खामगाव, ददसलेवाडी, फकराबाद, बावी, राजेवाडी, नान्नज, वंजारवाडी, पोटेवाडी तसेच चोबेवाडी मार्गे हा महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात प्रवेश करेल.
या महामार्गाचे स्वरूप
हा राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी नियोजित असून याची रुंदी 70 मीटर असणार आहे व महामार्गासाठी जमीन अधिग्रहण हे 100 मीटर साठी होणार आहे. डिसेंबर 2025 पर्यंत हा महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे शासनाचे लक्ष आहे. यासाठी सुरत ते अहमदनगर हे 290.70 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठीचा डीपीआर देखील तयार करण्यात आला आहे.






