तालुक्यातील डोळेवाडी येथे शेतातील रस्ता करण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

दोन्ही गटातील एकुण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

तालुक्यातील डोळेवाडी या ठीकाणी शेतातील रस्ता करण्याच्या कारणावरून दोन गटात लोखंडी पाईप व दगडाने हाणामारी झाली. या मध्ये दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी दाखल करण्यात आलेल्या फीर्यादी वरुन एकुण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहील्या फीर्यादीत शिवाजी दगडु डोळे यांनी म्हटले आहे की आरोपी वैजनाथ सदाशिव डोळे, भरत दिलीप डोळे, कृष्णा महादेव डोळे, सदाशिव रावसाहेब डोळे, काशिबाई सदाशिव डोळे व सुमन महादेव डोळे हे ३० ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फीर्यादी च्या डोळेवाडी येथील घरासमोर आले व फीर्यादीस म्हणाले की तु ग्रामपंचायतीला आमच्या रानात रस्ता करायचा का सांगितले असे म्हणुन वरील आरोपींनी लोखंडी पाईप व दगडाने मारहाण केली यावेळी फीर्यादी ची पत्नी देखील भांडणे सोडवण्यासाठी आली असता तीला देखील मारहाण करण्यात आली.

या नंतर परस्परविरोधी दुसर्‍या दाखल करण्यात आलेल्या फीर्यादीत फीर्यादी वैजनाथ सदाशिव डोळे रा. डोळेवाडी ता. जामखेड यांनी म्हटले आहे की आरोपी शिवाजी दगडु डोळे, केशव दगडु डोळे, मिनाक्षी केशव डोळे व कांताबाई शिवाजी डोळे सर्व रा. डोळेवाडी ता. जामखेड वरील वेळी व ठीकाणी दि ३० रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फीर्यादीस रस्ता करण्यास मी सांगितले का आसे म्हणून वरील आरोपी यांनी फिर्यादीस दगडाने व लाथा बुक्क्याने मारहाण केली तसेच फीर्यादी चा भाऊ कृष्णा व भरत हे भांडणे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली व माझे नाव घेतले तर तुमचा काटा काढीन आशी धमकी दिली.

या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी दाखल करण्यात आलेल्या फीर्यादी वरुन वरील एकुण दहा आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. ज्ञानदेव भागवत हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here