

जामखेड तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन निवडणूकीत तात्यासाहेब बांदल विजयी.
जामखेड प्रतिनिधी
दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची आसलेल्या जामखेड तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन च्या निवडणुकीत तात्यासाहेब बांदल हे विजयी झाले. या निवडणुकी नंतर विजयी आणि पराभुत अशा दोन्ही उमेदवारांनी एकमेकांचा सत्कार करुन समाज्या समोर आदर्श घालुन दिला.

जामखेड तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन ची तीन वर्षे कालावधी आसलेली तालुका अध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच जामखेड येथे संपन्न झाली. या निवडणुकीत तात्या बांदल व आणि सचिन जाधव हे दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे दोघांमध्ये सरळ सरळ लढत झाली. एकुण १७८ सभासदांनी मतदान केले. या मध्ये तात्या बांदल यांना ९५ मते मिळाली, तर दुसरे उमेदवार सचिन जाधव यांना ८३ मते मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून निवडणूकीचा जोरदार प्रचार दोन्ही उमेदवारांनी केला होता. प्रत्येक मतदार असलेल्या औषध दुकानदारापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न करत होते. आपल्याला मतदान करावे यासाठी प्रयत्न केले. अखेर अटीतटीच्या लढतीत तात्या बांदल यांनी विजय मिळविला. निवडणुक निर्माण अधिकारी म्हणून नारायण राळेभात, अनिल बोथरा व प्रविण कात्रजकर यांनी काम पाहिले.

निवडणूकीच्या निकालानंतर विजयी उमेदवार व पराभुत उमेदवार या दोघांनी खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले. दोघांनी एकमेकांचा फेटा बांधुन सत्कार केला. आसे चित्र कोणत्याही निवडणुक झाल्यानंतर पहायला मिळणे दुर्मिळच! मात्र या दोन्ही सभासदांनी दिलेला ‘कैल’ संयमाने स्विकारला आणि एकमेकांचा सन्मान करुन मेडिकल असोसिएशन च्या पुढील कार्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडणूकीच्या निकाला नंतर या दोघाही उमेदवारांनी दाखवलेल्या खिलाडू वृत्तीचे दर्शन सर्वच निवडणुका लढवणाऱ्या व्यक्तींसाठी ‘आदर्शवत’ ठरेल.






