रांगोळी स्पर्धेत गैरी दळवी प्रथम, मयुर सोले द्वितीय तर तृतीय क्रमांक कीर्ती मोरे यांनी मिळविला

प्रदिप टापरे मित्र मंडळाच्या वतीने दिपावली पाडव्या निमित्त रांगोळी स्पर्धा संपन्न.

जामखेड प्रतिनिधी

प्रदिप टापरे मित्र मंडळाच्या वतीने दिपावली पाडव्या च्या निमित्ताने नुकत्याच घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत गैरी दळवी हीने प्रथम क्रमांक मिळवला तर मयुर सोले द्वितीय क्रमांक, किर्ती मोरे हीने तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ रोहन मोरे यांनी मिळविला.

सहभागी स्पर्धकांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे तालुका प्रमुख पांडुराजे भोसले व मनसे ताइ अध्यक्ष प्रदिप टापरे यांच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी विजेत्या स्पर्धकांना भेट वस्तू देऊन सन्मानित केले. 

जामखेड शहरातील श्री कृष्ण मंदिर (मोरे वस्ती) येथे प्रदीप (भाऊ) टापरे मित्र परिवाराच्या वतीने दिपावली पाडव्या निमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. काल २७ रोजी सकाळी ११.०० वा स्पर्धेला सुरुवात झाली. या मध्ये रांगोळी स्पर्धेसाठी स्पर्धेक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्पर्धकांना स्पर्धे विषयी विचारले असता स्पर्धेक म्हणाले की, प्रदीप (भाऊ) टापरे मित्र परिवाराच्या वतीने दिपावली पाडव्या निमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल मनस्वी आभार. धावपळीच्या युगात कला – गुणांना वाव मिळावा तसेच खास दिपावली निमित्त सुट्टीच्या वातावरणात रांगोळी स्पर्धेचा सर्वांना आपली कला सादर करता यावे. यासाठी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन आहे.

याप्रसंगी प्रदीप टापरे, आबासाहेब वीर ( सर), बापू आरेकर, बालाजी मराळ, निलेश जगताप, सागर राळेभात, उमेश राळेभात,बाळु मोरे, सुधीर सुळे, रवि राऊत, अशोक राऊत, सागर घुमरे, संतोष सोले, राजू टापरे , सोहम वराट, अवि गव्हाणे आदी उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सत्यम् मोरे , ओम टापरे, यश मोरे, यश दळवी , रोहन मोरे ,आयुष बोधले, ऋषि माने यांनी परीश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here