

चौंडीत अवैद्य दारूबंदी करण्याची तरुणांची मागणी
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील चौंडी या ठीकाणी गावातील होत असलेल्या अवैद्य विक्री बाबत चौंडी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या बाबत चौंडी या ठीकाणी सुरू असलेली अवैद्य दारु विक्री बंद करण्यात यावी यासाठी आज ग्रामस्थांनी जामखेड पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय या ठीकाणी निवेदन दिले.

या बाबत ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चौंडी हे गाव पर्यटनस्थळ आसल्याने या ठीकाणी पर्यटकांची गर्दी असते. गावच्या प्रवेशद्वारा वरच चिकन चे दुकान टाकले आहे. याठिकाणी अवैद्य दारु विक्री केली जाते. अनेक वेळा या ठीकाणी दारु पिणाऱ्या व्यक्तींती पर्यटकांशी हुज्जत घातली आहे. या बाबत संबंधित व्यक्तीला सांगायला गेलो तर ते ग्रामस्थांना दमदाटी करतात. ग्रामपंचायतीला सांगितले तरी देखील काही निष्पन्न होत नाही त्यामुळे ग्रामस्थांनी कोणाकडे दाद मागायची.

चौंडी गावात दुसर्या एका प्राथमिक शाळेच्या व आश्रम शाळा अशा दोन्ही शाळांपासुन १०० मिटर च्या आत आहे. त्याला देखील दारुचा गुत्ता बंद करायला सांगितले मात्र तो देखील एकत नाही. शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांवर याचा परीणाम होत आहे. तसेच अवैद्य दारु मुळे गावातील उध्वस्त होणारे संसार वाचवावे त्यामुळे या गावात सुरू आसलेल्या अवैध दारू धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थ विजय भांडवलकर, शरद शिंदे, दादा सोनवणे , दीपक मोरे, विनोद साठे, काळू सोनवणे यांच्या तर्फे तहसीलदार कार्यालय व पोलिस स्टेशन मध्ये सादर करण्यात आले. या निवेदनावर वरील ग्रामस्थांनसह सुनिल उबाळे, कल्याण शिंदे, अजित शिंदे, अशोक शिंदे, संतोष उदमले, डॉ अरविंद उदमले सतिश देवकर यांच्या सह्य़ा आहेत.







