

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसा संकल्प ग्रामसंघाच्या माध्यमातुन कीराणा कीट चे वाटप
जामखेड प्रतिनिधी
जामखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटाविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसा निमीत्त मार्गदर्शक आ. प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शक सुचनेने नान्नज येथील संकल्प ग्रामसंघाच्या माध्यमातुन गरीब व गरजु कुटुंबातील बचत गटातील महिलांच्या कुंटुबासाठी दिपावली सणा निमीत्त मोफत किराणा सामान व आत्यअवश्यक चीज वस्तुचे वाटप करण्यात आले.

आपल्या आजुबाजुला आपण पाहिले तर दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडत साजरी होत असते. त्यांना कुठेतरी कीराणा सामान देऊन त्यांचा आर्थिक भार कमी व्हावा. त्यांनाही काही क्षण गोड-धोड खाऊन, लखलखाट जाणवावा तसेच आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. त्यामुळे याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देण्याच्या भावनेतून नान्नज येथिल संकल्प महिला ग्रामसंघाच्या वतीने त्यांना दिपावलोच्या शुभेच्छा देऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला या प्रसंगी ग्रामसंघाच्या सामाजिक समितीच्या अध्यक्ष सुनीता ताई भवळ कृषी सखी दर्शना ताई साळवे व ctc मनीषा ताई मोहळकर उपस्थित होत्या.






