राजुरी येथील मोफत शिबिरात १५० पेक्षा जास्त लोकांची तपासणी

सामाजिक कार्यकर्ते सागर (भाऊ) कोल्हे यांनी केले होते शिबिराचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते मा सागर भाऊ कोल्हे यांनी राजूरी मध्ये मोफत फिजिओथेरपी पायांची मसाज व निसर्ग उपचार शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये 150 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवून या शिबिराचा लाभ घेतला आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांना व जेष्ठ नागरिकांना खाजगी हॉस्पिटल मध्ये तपासणी व उपचार पडवत नाही. त्यामुळे त्यांचा आर्थिक खर्च वाचण्यासाठी व एक सामाजिक बांधिलकी जपली जावी यासाठी राजुरी येथिल सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

राजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते सागर (भाऊ) कोल्हे यांनी आज पर्यंत राजुरी डोळेवाडी, एकबुर्जी,बांगरवस्ती येथे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत, भविष्यात पण असेच उपक्रम राबविले जातील अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मा सागर भाऊ1कोल्हे यांनी दिली, हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सागर भाऊ कोल्हे मित्र परिवार यांनी मोलाचे सहकार्य केले.

या वेळी जेष्ठ मार्गदर्शक धनाजी शिंदे, महादेव शिंदे, विलास कोल्हे, मल्हारी गायकवाड ,लटपटे मामा, दगडू कोल्हे, सरपंच गणेश कोल्हे, पोपट पिसाळ, अश्रू मेजर काळदाते, गौतम काळदाते, आप्पासाहेब राऊत, विठ्ठल मोरे, उपसरपंच बाबासाहेब घुले, ग्रामपंचायत सदस्य बबन कोल्हे, धनराज कोल्हे, मच्छिंद्र कोल्हे, डॉ नानासाहेब खाडे,मल्हारी सदाफुले,विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे व्हाईस चेरमन विजय खाडे, संचालक गोकुळ कोल्हे, विकास गायकवाड, आलेश मोरे, संजय चौभारे, डॉ युवराज चौभारे, उत्तम चौभारे, जयसिंग कोल्हे,अमोल पिसाळ, सचिन कोल्हे,दत्ता डोंगरे, यांच्या सह सागर भाऊ कोल्हे मित्र परिवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here