महीला प्रवाशाच्या पर्समधील ५० हजारांची चोरी ; जामखेड बसस्थानकावर चोरट्याने मारला डल्ला.

जामखेड प्रतिनिधी :२३ ऑक्टोबर

दिवाळीच्या सणानिमित्त गावी आलेल्या महिलेवर एक वेगळाच प्रसंग आला असून पुणे जिल्ह्य़ातील तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ कॅम्प येथे राहणाऱ्या (नान्नज येथील मुळ रहिवासी) डिंपल बाळासाहेब फदाडे (वय २८ वर्ष) या जामखेड येथील बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील पर्समध्ये ठेवलेल्या ५० हजार रुपयांच्या रोख रक्कमेवर कोणीतरी अज्ञात चोरट्याने डल्ला मारला.

दि. २२ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी ५:२० वाजताचे सुमारास घडली आहे. यानुसार फिर्यादी डिंपल बाळासाहेब फदाडे (वय २८ वर्ष) धंदा घरकाम हल्ली रा. सीआरपीएफ कॅम्प तळेगाव दाभाडे पुणे. मूळ रा. नान्नज, ता.जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाळीच्या मुहुर्तावर ही घटना घडल्याने प्रवास्यांनी प्रवास करताना आपल्या सामानाची व मौल्यवान वस्तूंची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here